कोल्हापूर (प्रतिनिधी) : देवकर पाणंद येथील सरदार पार्कमध्ये ओळखीचा गैरफायदा घेत घरातून ८ हजार रुपयांची रोकड व आधार कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रवींद्र दिनकर घाटगे (वय ५४, रा. सरदार पार्क, देवकर पाणंद) यांनी योगेश अशोक भोसले (वय ३५ रा. जयसिंग पार्क, कागल) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कागल येथील योगेश भोसले याची देवकर पाणंद येथील रवींद्र घाटगे याच्याशी ओळख निर्माण झाली होती. त्या ओळखीतून भोसले याने घाटगे यांच्या घरातील ८ हजार रुपयांची रोकड व घाटगे यांच्या पत्नीचे आधार कार्ड चोरून नेले. याप्रकरणी रवींद्र घाटगे यांनी योगेश भोसले याच्याविरोधात पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.