कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात आज (रविवार) वडगाव बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली ही देवाची कृपा असल्याचे आ. कोरे म्हणाले.

आ. कोरे म्हणाले की, इर्षेचं आणि द्वेषाचे राजकारण कुठेतरी थांबावं आणि राजकारण्यांकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा. असा विचार करून आपण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला. त्यासोबतच देवाच्या कृपेनेच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली, नाहीतर कोणत्याही माणसाच्या हातून हे घडणं शक्यच नसल्याची  मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

यावर आ. कोरे यांच्या शेजारी बसलेल्या महादेवराव महाडिक यांनी त्यांच्याकडे पाहत मनमोकळेपणाने हसत त्यांना दाद दिली.