गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी भुदरगड तालुक्यामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अनेक तरुणांनी मराठा आरक्षणाचे महत्त्व आणि ते कोणत्या पद्धतीने मिळवावे लागेल या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार आणि खासदारांनी रायगडवर येऊन छ. शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी. असा ठराव मंजूर करण्यात आला.

तर मराठा आरक्षणासाठी लढणारे खा. छत्रपती संभाजीराजे यांना यांचे पाठिंबा देण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. खा. संभाजीराजे जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहात इथून पुढे मराठा समाजाचे कार्य करीत राहण्याचेही ठरविण्यात आले. सहा जून शिवराज्याभिषेक दिनादिवशी खा. संभाजीराजे रायगडावरुन जी भूमिका घेतील तीच भूमिका भुदरगडमध्ये घेतली जाईल. इथून पुढे मराठा समाजासाठी आक्रमकतेने लढण्याचा निर्धार यावेळी सकल मराठा समाजाच्या घोंगडी बैठकीमध्ये करण्यात आला.

यावेळी, रोहित तांबेकर,शरद मोरे, प्रकाश मानगांवकर, आनंदा देसाई, सतीश जाधव, संग्रामसिंह पोफळे, नंदकुमार शिंदे, संदीप पाटील, शशिकांत वाघरे, गोंदा पाटील, प्रकाश वास्कर, प्रवीण सावंत, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.