नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. तर समाजवादी पक्ष,  बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे. मागील १० दिवसांमध्ये राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.  

२३ डिसेंबपर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये ४८ टक्के लोकांनी भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल, असे  मत व्यक्त केले आहे. तर ३१ टक्के लोकांनी यंदा समाजवादी पक्ष राज्यातील सत्ता काबीज करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मायावती पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येतील, असे ७ टक्के लोकांनी म्हटले आहे. ६ टक्के लोकांनी काँग्रेस तर २ टक्के लोकांनी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.