मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नाशिकच्या जागेचा पेच कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही गटानेही या जागेवर दावा केला आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे. तर छगन भुजबळ हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील. तर उमेदवारी मिळाल्यावर थकीत कर्जामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकी भरण्यास सुरुवात केल्याचे समजेत.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा असणार आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा बँकेची साडेसहा कोटींची थकबाकी भुजबळांनी भरली आहे. त्यामुळे भुजबळ हेच नाशिकचे लोकसभेचे उम्द्वर असतील अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

नाशिक जिल्हा बँक सध्या अडचणीत असल्याने त्यांनी थकबाकीदारांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच भुजबळ कुटुंबियांची मालकी असलेल्या दाभाडी येथील आर्मस्ट्रॉंग सारख कारखान्यावर असलेल्या 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी येथे जाऊन ‘आर्म स्ट्रॉंग’ च्या गेटवरही नोटीस लावली होती.
भुजबळ कुटुंबियांनी आतापर्यंत पहिल्या टप्प्यात साडे सहा कोटी भरले आहेत. तसेच कर्जातील उर्वरीत रक्कम म्हणजेच 28 कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं भरण्यात येतील, असे बँकेला कळवण्यात आलं आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेत हे थकीत कर्ज भरण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

नाशिकची जागा शिवसेनेचीच…
महायुतीतुन उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणारे छगन भुजबळ गेल्या दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून असतानाच दुसरे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा व्यक्त केला आहे. पुढील दोन तीन दिवसांत म्हणजेच गुढीपाडवाच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.