अबू धाबी (वृत्तसंस्था) : युएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलवर कोरोनाचा सावट आले आहे. त्याठिकाणी पोहोचलेल्या संघांपैकी चेन्नई सुपर किंग्ज संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाली. यात ऋतूराज गायकवाडचा समावेश आहे. त्याची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याने काळजी व्यक्त केली जात होती.

चेन्नईच्या संघातून सुरेश रैनाने माघार घेतल्याने त्याच्या ऐवजी ऋतुराजचा विचार केला जात होता. पण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चेन्नईची काळजी वाढली होती. ऋतुराजसह दीपक चाहरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण त्याचे दोन रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने तो संघात दाखल झाला. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.