आजरा(प्रतिनिधी) : आजरा पंचायत समितीच्या ६पैकी दोन जागा आरक्षित झाल्या तर तीन जागेवर महिलाराज  आणि एक जागा खुली राहिली आहे. आज तहसीलदार विकास अहिर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात आजरा पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले.

यावेळी प्रथम अनुसूचित जातीसाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये उतूर पंचायत समितीसाठी अनुसूचित जातीची  चिट्ठी आली, तर उर्वरित भादवण, कासारकांडगाव आणि गजरगाव या तीन पंचायत समितीसाठी सर्वसाधारण  महिलांसाठी आरक्षित झाले. नव्याने झालेल्या वाटंगी पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आले. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून होते; मात्र कोर्टाच्या फेरआरक्षणामुळे पुन्हा अनेक पंचायत समिती गण राखीव झाले. यावेळी तालुक्यातील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.