सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावचे जेष्ठ सहकार नेते, वारकरी संप्रदायातील वारकरी कृष्णात रामा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चक्क वडीलांच्या उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा दिला.

यावेळी पाटील कुटुंबीयांनी संपूर्ण गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरोघरी मास्क, सॅनिटायझरचे आज (गुरुवारी) वाटप करुन सामाजिक बांधलकी जोपासली आहे. गोकूळ दुध संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, अनिल सोलापूरे, राहुल पाटील,  संजय पाटील, शुभम पाटील युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, पाटील कुटुंबीय उपस्थितीत होते.