बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघर नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्व बेघर नागरिकांना घरे बांधून देण्याची घोषणा मोदी यांनी केली. देशातील ६ राज्यांत भूकंपरोधी घरे बनविण्याच्या योजनेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी)  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हाउसिंग टेक्नोलॉजी चॅलेंज इंडिया अंतर्गत… Continue reading बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान मोदींची ‘मोठी’ घोषणा

चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी थेट संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली… Continue reading चंद्रकांतदादांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

कोरोनानंतर फार मोठा बदल होणार नाही : डॉ. प्रकाश आंबेडकर

पुणे (प्रतिनधी) : केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करता आलेली नाही. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही, अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) केली. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  आंबेडकर म्हणाले,… Continue reading कोरोनानंतर फार मोठा बदल होणार नाही : डॉ. प्रकाश आंबेडकर

पंचगंगा नदीसंबंधी पालकमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंचगंगा नदी प्रदूषणबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलतत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले,… Continue reading पंचगंगा नदीसंबंधी पालकमंत्र्यांची महत्त्वाची सूचना

मुंबईवर दिल्लीचेही लक्ष : चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सुचक इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच भाजप-शिवसेनेचे दावे–प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीचे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading मुंबईवर दिल्लीचेही लक्ष : चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला सुचक इशारा

शिवसेना- काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

नागपूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्या अजेंड्यावर आणला आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यास विरोध केला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा शिवसेनेला आठवतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी… Continue reading शिवसेना- काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांचे ‘मोठे’ विधान

पुणे (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज (गुरूवार)  सकाळी अभिवादन केले. कोरेगाव भीमा परिसराचा विकास आराखडा मंजूर करून द्या. त्यास कोणतीही अडचण येऊन देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.  अजित पवार म्हणाले की, या स्तंभाच्या आसपासची जागा ताब्यात घेण्यासाठी… Continue reading विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांचे ‘मोठे’ विधान

‘त्याबद्दल’ चंद्रकांतदादा लिहीणार रश्मी ठाकरेंना पत्र..!

पुणे (प्रतिनिधी) : सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि… Continue reading ‘त्याबद्दल’ चंद्रकांतदादा लिहीणार रश्मी ठाकरेंना पत्र..!

ताराराणी राजवाडा दीपोत्सवात उजळला

पन्हाळा (प्रतिनिधी) : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करत शिवप्रेमी व जिजाऊ लेकीच्या उदंड सहभागाने ताराराणी राजवाड्यात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्षत्रिय जन संसदचे सभापती महेश पाटील-बेनाडीकर यांच्या संकल्पनेतून पन्हाळा गिरीदुर्ग नगरपरिषद आणि पन्हाळगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जागतिक शस्त्रात्रे संग्राहक व अभ्यासक गिरीश जाधव… Continue reading ताराराणी राजवाडा दीपोत्सवात उजळला

माजी मंत्र्यांकडे अवैध ४ हजार कोटींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटी 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासह कार्यालयामध्ये सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ४४ हून अधिक ठिकाणी ३ हजार ७९० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. तर चालकाच्या नावे २०० कोटींची  संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले… Continue reading माजी मंत्र्यांकडे अवैध ४ हजार कोटींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटी 

error: Content is protected !!