नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जोधपूर मध्यवर्ती कारागृहात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची बुधवारी सायंकाळी प्रकृती खालावली. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर आसाराला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

या त्रासासाठी आसाराम अँजिओग्राफी करायला तयार नाही. त्याला आयुर्वेद पद्धतीचा वापर करून बाहेरून उपचार करून घ्यायचे आहेत. त्याच्या पॅरोलसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे त्याला तुरुंगातच उपचार घ्यावे लागत आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याने आता त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

आसारामने महाराष्ट्रातील खापोली येथील माधवबाग आयुर्वेद रुग्णालयात पोलीस कोठडीत उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज सादर केला, ज्यावर 5 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी झाली. पुढील तारीख 9 जानेवारी देण्यात आली. 9 जानेवारी रोजी आसारामने सांगितले की, तुरुंगात असताना त्याचे आजार सतत वाढत होते, तर तुरुंगात जाण्यापूर्वी त्याला फक्त दोन आजार होते. यावरील न्यायालयाचा आदेश तूर्त राखून ठेवण्यात आला आहे.