कोल्हापूर (प्रतिनिधी) :  बेकायदेशीर विनापरवाना घातक शस्त्रे (तलवारी) विक्री करण्यास आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातकणंगले – कुंभोज रोडवर सापळा लावून अटक केली.

पियुष रामगोंडा पाटील (रा. कुंभोज ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या संशयित आरोपीच नांव असून त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक दुचाकी असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, राजीव शिंदे, फिरोज बेग, आयुब गडकरी,  सूरज चव्हाण, संजय पडवळ यांनी केली.