-डी वाय पाटील साळोखेनगर मध्ये ‘इन्वेंटो 2024’ संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी )विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच टेक्निकल ज्ञान आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह इंडस्ट्रीच्या गरजेनुसार आधुनिक सॉफ्टवेअर, ट्रेनिंग आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे टेक्निकल इव्हेंट विद्यार्थ्यांना त्यांचे स्किल्स दाखवण्याची उत्तम संधी देतात व यातूनच पुढे नवे स्टार्टअप सुरू होऊ शकतात, असे प्रतिपादन ISTE महाराष्ट्र व गोवा सेक्शनचे चेअरमन व शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांनी केले

साळोखेनगर येथील डी वाय पाटील इंजिनिअरींग कॉलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्वेंटो 2024’ टेकनिकल इव्हेंटच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रणजित सावंत बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, रत्नागिरी, मुंबई, बेळगाव, हुबळी येथून 800 पेक्षा जास्त विद्यार्थी इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.

प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व व्यक्तित्व विकास होण्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम घेतले जातात याबद्दल माहिती दिली.

इन्वेंटो अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंगमधून मॉडेल मास्टर, कलॅश ऑफ कॅड, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तर्फे बग बाँटी, डेटा सायन्स इंजिनिअरिंग तर्फे डेटा स्पिअर, इलेक्ट्रिकल इंजिीअरिंगतर्फे रोबो रेस, एलेक्ट्रोहांट त्याच बरोबर टेक स्पार्क प्रोजेक्ट स्पर्धा, गर्ल्स ॲक्शन मनिया हे सर्व इव्हेंट डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. या इव्हेंट साठी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांचे आयोजकतत्व लाभले. या इव्हेंट साठी 20 पेक्षा ज्यास्त ब्रँड्सनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. या इव्हेंट मध्ये डी वाय पाटील कॉलेज कसबा बावडा, केआयटी, डीकेटीई इचलकरंजी कॉलेजसह अन्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले. विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी, सर्टिफिकेट देवून गौरविण्यात आले.

या इव्हेंटचे संयोजन डीन स्टुडंट वेलफेअर प्रा. गौरव देसाई, डीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. अमर पाटील व विद्यार्थी समन्वयक, स्टाफ यांनी केले. या इव्हेंटसाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, विश्वस्त आमदार . ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.