मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष नेते जोरदार प्रचाराला लागले आहे. आज पासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशातच गुरुवारी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगली येथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीची जोरदार जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली हजेरी लावली होती . यावेळी जाहीर सभेत उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला. वसंतदादांनी चांगले कारखाने काढले. मात्र, या कारखान्याचे वाटोळं कोणी केलं? आज दुसऱ्याला साखर कारखाना चालवायला देता? कारखाना चालवण्याची तुमच्यामध्ये धमक नाही का? आम्ही चांगल्या पद्धतीने साखर कारखाने चालवून दाखवतो. अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार..?

. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेतकरी सकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना ओळखला जायचा. परंतु, हा कारखाना आता कोणतरी धारू आहे आणि तो धारू कारखाना चालवतो आणि आम्ही बघत बसतो ही तुमची परिस्थिती आहे. तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला अशा जोरदार टीकास्त्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर लगावला

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांनी सांगितले की, तुम्ही दुसऱ्याला चालवायला कारखाने देता, पण साखर कारखाना चालवायची तुमच्यामध्ये धमक नाही. आम्ही साखर कारखाने चांगले चालवून दाखवतो, बँकांचं काय केलं? आज काय स्थिती आहे? अशी विचारणा त्यांनी केली. यांच्यावर काँग्रेस नेते विशाल पाटील काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे