मुंबई (प्रतिनिधी) :  महापुरूषांच्या अपमानावरून विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आज आक्रमक झाले. कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे चुकतील त्यांना कायद्याचा बडगा दाखवा, यांना तुरुंगात टाका, पदावरून हाकालपट्टी करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

अधिवेशनात अंतीम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलत होते. “सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आहे. मात्र तेव्हापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात आहे. तेथे बंदुकीचे  निशाण असलेला झेंडा फडकवण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या मतदार संघात या गंभीर घटना घडत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय.