मुंबई – सध्या लोकसभेचं पडघम वाजत आहे . काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपले एक वक्तव्य गळाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत. अशातच काल इंदापूर येथे एका मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा – महेश तपासे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना पैशांचं अमिष दाखवत आहेत. अजित पवार यांनी कायद्याचं आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते महेश तपासे यांनी केली आहे. आम्हाला कचा कचा कचा बटण दाबून मतदान करा, पाहिजे तेवढा भरघोस निधी देतो हे अजित पवार यांनी इंदापूरातील एका प्रचारसभेत बोलताना हे वक्तव्य केले आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. अजित पवार हे मतदारांना पैशांचं अमिष दाखवत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे प्रमुख मागणी महेश तपासे यांनी केली आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते पाहणे म्हणत्वाचे असणार आहे.

मी ते गमतीने म्हणालो होतो – अजित पवार

अजित पवार म्हणाले तुम्ही ध् चा मा करू नका, मी हे हसत हसत गमतीने बोलत होतो, . त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या कार्यक्रमात सगळे प्रतिष्ठित डॉक्टर्स होते, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.