मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) आजचा दिवस चांगलाच ठरला. च्या दिवशी बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२३अंकांनी वधारत ६,१३३.८८ अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक ६८.५०अंकांनी वधारत १८,१९१.०० अंकांवर बंद झाला. 

सेन्सेक्स निर्देशांकातील ३० पैकी १९ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, ११ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी ५० निर्देशांकातील ३३ शेअरमध्ये खरेदीचा उत्साह दिसला. तर, १७ कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या ३६२८ कंपन्यांमध्ये आज ट्रेडिंग झाली. त्यापैकी १८७२ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, १९०७ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर १४९ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.