मुंबई/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीला यवतमाळ-वाशीममध्ये मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित लक्ष्मण राठोड, रा. दारव्हा यांनी गुरूवारी नामांकन अर्ज दाखल केला होता. आज शुक्रवारी सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. या छाननीत वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यातच यवतमाळ – वाशिम या लोकसभेच्या मतदारसंघात वंचितने ऐनवेळी उमेदवर बदलून नव्या चेहऱ्याला संधी दिली होती. आता याच उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. पण, अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदासंघासाठी आपला नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल 4 एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार आहे. दरम्यान यावतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना वंचितचे उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

वंचितने उमेदवार बदलले
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितने बदलले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांना काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये .यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना उमेजवारी दिली होती. त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती.