कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातून महापालिकेला सर्वाधिक कर राजारामपुरीमधून दिला जातो. मात्र, त्या तुलनेत या ठिकाणी कोणतेही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. सुमारे दोन हजारांवर दुकाने आहेत. मात्र, त्यांच्या पार्किंगसाठी जागा नाही. महापालिकेने राजारामपुरीतील पोपटराव जगदाळे हॉलच्या ठिकाणी हॉल तसाच ठेवून येथे बहुमजली पार्किंग करावे. यातून महापालिकेला आर्थिकस्त्रोत निर्माण होईल. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळेल. तर पार्किंगसाठी नवीन डीपीमध्ये गार्डनचे आरक्षण बदलून तेथे बहुमजली पार्किंगची आरक्षण टाकावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राजारामपुरी ही सुनियोजनबद्ध वसली आहे. मात्र कालांतराने तिथे आता बंगल्याच्या ठिकाणी अपार्टमेंट झाले आहेत. राजारामपुरी मुख्यमार्ग बस मार्ग आणि श्रीराम विद्यालय या तिन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात जगभरातील नामांकित करण्याचे शोरूम झाले आहेत. त्याचबरोबर 2 हजारांपेक्षा षा जास्त दुकानगाळे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी येणारे ग्राहक यांचे वाहने दररोज असतात.
राजारामपुरीत कुठेच पे पार्किंग दिसून येत नसल्यामुळे या गाड्या रस्त्यावर लावलेले असतात. त्यामुळे राजारामपुरी गार्डनच्या जागा आणि जगदाळे हॉलला तीन बाजूने एन्ट्री आहे. महापालिकेने जगदाळे हॉलच्या ठिकाणी भव्य पे पार्किंग उभे करावे. यामुळे राजारामपुरी पार्किंगचा प्रश्न संपुष्टात येईल. तसेच महापालिकेला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल. तर महानगरपालिकेची आर्थिकस्थिती मजबूत होईल. मात्र, बीओटी तत्त्वावरही महापालिका हा प्रकल्प राबवू शकेल, असे प्रतिज्ञा उत्तुरे यांनी निवेदन म्हटले आहे.