कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गणेश चतुर्थीच्या आधी टेंबलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमानीपर्यंत खड्डे मुजवण्याबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. याची दखल घेत त्यांनी ते तात्पुरते मुजवले होते. पण दोनच दिवसात ते रस्ते उकलले. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कमीत कमी 30 ते 40 छोटेमोठे अपघात झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तर हायवे ब्रिज खाली होणारी सततची वाहतूक कोंडी त्यातून मार्ग काढताना खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. या विषयावर आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचित केले होते. मात्र, त्यांनी त्याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय. असा सवाल केला. तर शाखा उप अभियंता श्रीकांत सुतार यांना सांगितले की शिवसेनेचे आंदोलन केल्यानंतर कामे होतात, असा एक लोकांच्या चर्चेचा विषय आहे. तरी इथून पुढे आंदोलन करण्यास भाग पडू नये अशी कामे करावी असे मत सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले,बाळासाहेब नलवडे, विराग करी, राजू यादव,दिपक पाटील, संतोष चौगुले, सचिन नागटिळक, योगेश लोहार,अक्षय परीट, संजय काळुगडे,दीपक रेडेकर,आबा जाधव, बंडा पाटील, धनंजय पाटील, उत्तम अडसूळ, पोपट रुईकर, कृष्णात हेगडे, राजाराम पाटील, आकाश शिंदे, प्रमोद शिंदे, जावेद भाई,गजानन यडुरकर, अरुण साळुंखे, अनिल शेलार, शिवसैनिक उपस्थित होते.