टोप (प्रतिनिधी): टोप येथील शतक महोत्सवी पूर्ण केलेल्या छत्रपती राजाराम विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी अभिजीत मुळीक, तर व्हा. चेअरमन पदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत इंगवले, मच्छिंद्र मुरूडकर, दादासाहेब थोरात उपस्थित होते. एकूण ९ संचालक उपस्थित होते. तर ७ संचालक अनुपस्थित राहिले.
मुकूंद पाटील आणि रामचंद्र पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
यावेळी विठ्ठलपंत पाटील, दिलीप पाटील, मुकुंद पाटील, शिवाजी चौगुले, रामचंद्र पाटील, विजय घोरपडे, भाग्यश्री मुळीक, ज्ञानदेव पाटील, अभयसिंग घोरपडे, संतोष पाटील, संदीप मुळीक व सचिव शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 810