धामोड (सतिश जाधव) : राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून पाच जिल्हा परिषद मतदार संघापैकी राशिवडे बुद्रुक आणि राधानगरी मतदार संघ खुला शिवाय कसबा तारळे आणि सरवडे सर्वसाधारण महिला तसेच कसबा वाळवे ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) असे आरक्षण जाहीर झाले आहे.

राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघ खुला मतदार संघ झाला असून या जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत धामोड पंचायत समिती खुला आणि राशिवडे बुद्रुक पंचायत समिती सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही या अगोदर जिल्हा परिषद स्थापनेपासून सुरुवातीच्या काळात या मतदारसंघावर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व होते.परंतु 2002 पासून आज पर्यंत येथे राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मुसंडी मारली आहे.

सध्याचा आरक्षणाचा विचार करता येथे तिरंगी अथवा चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये मागील निवडणुकीचे उमेदवार विनय पाटील,सागर धुंदरे शिवाय सुरुवातीला उमेदवारी जाहीर होऊन देखील पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून थांबलेले बाळासाहेब नवणे शिवाय या धामोड पंचायत समितीच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य वंदना हळदे यांचे पती विलास हळदे या प्रमुख नावांची चर्चा रंगू लागली आहे. आरक्षण जाहीर झाल्या नंतर चार इच्छूक उमेदवारांची लाईव्ह मराठी ने संपर्क साधला असता त्यांनी आपली मते मांडली आहेत पहा.

विनय पाटील- हे या जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत.या तालुक्याचे नेते आणि केडीसीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस यातून त्यांना ही उमेदवारी दिली मिळाली होती हे नाकारता येणार नाही पण मागील विधानसभा निवडणुकीत ए वाय पाटील यांची अपक्ष उमेदवारी असून देखील त्यांनी पक्ष श्रेष्ठींचा शब्द मानून माजी आमदार के पी पाटील यांच्याबरोबरच धांबले होते. या अगोदर त्यांच्या मातोश्री सौ दीपा राजेंद्र पाटील यांनी देखील या जिल्हा परिषद मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघात त्यांचा गेली दहा वर्ष चांगला संपर्क आहे केलेल्या कामाच्या जोरावरच आपण महायुतीतून या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले

सागर धुंदरे – हे राशिवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. शिवाय भोगावती स. सा. कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन आणि गोकुळचे माजी संचालक पी. डी धुंदरे यांचे यांचे ते सुपुत्र होत. गेली अनेक वर्षे दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांच्या गटाशी ते एकनिष्ठ आहेत शिवाय नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेलेले त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांच्याबरोबरच त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील निवडणुकीत झालेला निसटता पराभव सागर धुंदरे यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे.पराभूत होऊन देखील गेली पाच वर्ष या जिल्हा परिषद मतदार संघातील सामाजिक कार्यात ते सतत कार्यरत आहेत त्यांचे मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांच्याही उमेदवारीने चांगले वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवणारच असे त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले.

बाळासाहेब नवणे – जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत नेते अण्णासाहेब नवणे यांनी पंचायत समिती पासून ते जिल्हा परिषद काही काळ शिवाय तीन ते चार दशके या जिल्हा परिषद मतदार संघावर आपली राजकीय कुशलता आणि कामाच्या जोरावर आपली पकड ठेवली होती. शिवाय आजही त्यांच्या विचारांना मानणारा एक मोठा गट या जिल्हा परिषद मतदार संघात आहे त्यांचे जेष्ठ सुपुत्र बाळासाहेब नवणे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले मागील निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी मागितले होती शिवाय काही दिवस प्रचार यंत्रणा देखील कार्यरत केली होती परंतु पक्ष श्रेष्ठीच्या सांगण्यावरून मागील निवडणुकीत आपणास थांबावे लागले. मागील तिन्ही विधानसभा निवडणुकीत आपण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या मागे ठामपणेपण उभा राहून निर्णयक मते दिली आहेत त्यांच्याबरोबरच या निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत शिवाय गेली वीस वर्षे तुळशी- धामणी परिसराला जिल्हा परिषद सदस्य पदापासून अलिप्त रहावे लागले आहे त्यामुळे या परिसराला न्याय मिळवून देण्यासाठी आणि नवणे आण्णांचा विचार पुढे नेण्यासाठी हे निवडणूक लढवणारच असे त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगताना सांगितले

विलास हळदे – हे खामकरवाडी गावचे माजी सरपंच तसेच राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांचे तुळशी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. शिवाय त्यांच्या पत्नी वंदना हळदे यांनी मागील निवडणुकीमध्ये धामोड पंचायत समिती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारी घेऊन पंचायत समितीचे सभापती पदी भूषवले आहे त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती यांनी आपल्या नावाचा विचार करावा असे त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितले.

शिवाय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना , शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना गट यातून आणखीन उमेदवारांची नावे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री या परिसराचे विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून या प्रमुख नावाबरोबरच आणखीन एखादे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.