टोप (प्रतिनिधी) : टोप येथील सचिन पाटील यांची भाजपा वडगाव मंडळ हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी नुकतीच भाजपाच्या हातकणंगले तालुका कार्यकारणी निवड जाहीर केली.
यामध्ये सचिन पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच भाजपा पक्षाच्या विविध उपक्रम अभियानमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या निवडीसाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक तसेच गोकुळ संचालिका तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांचे सहकार्य लाभले आहे.
Post Views: 108