टोप (प्रतिनिधी) : सादळे मादळे येथील चैतन्य रिसोर्ट येथे जेवणाचे बिल कमी करण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना जबर मारहाण तसेच रिसोर्टची तोडफोड करणाऱ्या बारा हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांना 10 जुलैरोजी कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.या हल्ल्यात आरोपींनी लोखंडी रॉड , एडका , कोयता , हॉकीस्टीक , लाठी काठी , चाकू, तलवार अशी घातक हत्यारे घेवून दिसेल त्याला मारहाण केली होती. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले होते . यावेळी केलेल्या तोडफोडीत रिसोर्ट चे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान केले होते .
पोलिसातून मिळालेली माहिती नुसार, सादळे मादळे येथे चैतन्य रिसोर्ट हे सर्व सोयिनियुक्त रिसोर्ट असून येथे पर्यटक व ग्राहकांच्या नेहमी मोठी वर्दळ असते. काल मंगळवारी सायंकाळी दत्तात्रय मारुती गडकरी, वय 48 वर्षे, (रा. आर. के. नगर नवीन वसाहत, शहापुर, इचलकरंजी), रमेश शिवगण पटेल, वय 42 वर्षे, रा. ओमकारेश्वर मंदीर, आर. के. नगर, यड्राव्ह, ता. शिरोळ, अनिल बाबुराव पाटील, वय 44 वर्षे रा. गल्ली न. 5, सांगली रोड, आसरा नगर, इचलकरंजी, सदाशिव किसन कोरवी, वय 49 वर्षे, रा. यड्राव ता. शिरोळ, रहात लालमहम्मद मुजावर, वय 26 वर्षे, रा. गल्ली न. 1, सांगली रोड, आसरा नगर, इंचलकरंजी, निळकंठ आप्पासो कोळी, वय 50 वर्षे, रा. गल्ली न. 4, सांगली रोड, आसरा नगर, इचलकरंजी, सुभाष पोपट काळे, वय 31 वर्षे रा. तारदाळ, सिंकदर हुसेनसाब गड्डेकर, वय 45 रा. अष्टविनायक नगर, खोतवाडी, ता. हातकणगले , हरिष रामचंद्र नाईक, वय 37 रा. राजीवगांधीनगर यड्राव, ता. शिरोळ, पवन अनिल रणदिवे, वय 26 रा. बिरदेव मंदीर जाधवगल्ली पुलाची शिरोली ता. हातकणगले ,महेश बजरंग दळवी, वय 41, रा. दानोळी, ता. शिरोळ , सत्यजित वसंत मोकाशी, वय 45 , रा. दानोळी, ता. शिरोळ हे बाराजण चैतन्य रिसोर्ट येथे आले होते.
यावेळी बिलातमध्ये सुट घेण्यावरून रिसोर्ट कर्मचारी व यांच्यात शाब्दिक बाचाबाची शिवीगाळ झाली. यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी यापैकी काहीजणांना मारहाण केली होती . या बाराजणानी तुम्हाला बघून घेतो म्हणत बाहेर पडले आपल्या मित्र मंडळीना मोबाईलवरून संपर्क साधून बोलावून घेतले . रात्री दहा वाजण्यासुमार यानी हातामध्ये लोखंडी रॉड, एडका , लाठी काठी, चाकू, तलवार अशी घातक हत्यारे घेवून
रिसोर्ट वर हल्ला करत दिसेल त्याना मारहाण करत सर्व साहीत्याची मोडतोड सुरू केली. येथील दोन कर्मचाऱ्यांना त्यानी आपल्या ताब्यात घेवून कारच्या डिक्कीत घालून रात्रभर ठिक ठिकाणी फिरवत मारहाण करून पहाटेच्या वेळी कासारवाडी फाट्यावर टाकले होते. या जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सिपिआर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी माहिती घेऊन या गुन्ह्याचा तपास करत बारा हल्लेखोरांना अटक केली या गुन्ह्यातील आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार आहे . पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत दरम्यान आज या बारा हल्लेखोरांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता त्याना सोमवार पर्यंत ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये गुन्ह्यात सहभागी अन्य आरोपींचा शोध घ्यायचा आहे तर गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्याची आहेत यासाठी तपास करण्यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मागणी वरून न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या सह पोलीस करत आहेत.