कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांना इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट या जगातील नामांकित संस्थेकडून संशोधनासाठी 45 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

या शिष्यवृत्तीमुळे मुलांना काँक्रीट वरील संशोधनासाठी विशेष मदत होणार आहे. तर काँक्रीट विषयामध्ये शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्याकडून शिष्वृत्तीधारक विद्यार्थी स्नेहल निकम, सानिका शिंदे, तेजस माने आणि विभाग प्रमुख डॉ. किरण माने यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय समन्वयीका प्राध्यापक वर्षा डोईजड उपस्थित होत्या.

तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे विशेष सहकार्य लाभले.