कोल्हापूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद येथे झालेल्या २४ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०२२ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने महिला व पुरुष दोन्ही गटांमध्ये द्वितीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद आणि जनरल चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक संपादन केला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २२ विद्यापीठांच्या संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्तुंग यश संपादन केले. एथलेटिक्स मुलींच्या आणि मुलांच्या संघाने दोन्ही गटात प्रथमच जनरल चॅम्पियनशिप मिळवून इतिहास घडविला. त्याचबरोबर सांघिक खेळामध्ये कबड्डी (पुरुष) व बास्केटबॉल महिला संघाने रजत पदक प्राप्त केले. खो-खो (महिला व पुरुष) तसेच बास्केटबॉल (पुरुष) हे तिन्ही संघ कांस्यपदकांचे मानकरी ठरले.