मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारमार्फत आयोध्या राम मंदिर मुर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने उत्सवासाठी जंगी तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत मोठा निर्णय जाहीर करत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

आमदार सत्यजीत तांबेंसह अनेक नेत्यांनी 22 जानेवारीला श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं. मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.


राज्यात दारू आणि भांग विक्रीच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. गोवा सरकारने 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.