कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३७४ तर करवीर तालुक्यात ३३४ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३७४, आजरा- ४४, भुदरगड- ४१, चंदगड- ३१, गडहिंग्लज- ६१, गगनबावडा – ३, हातकणंगले – २१७, कागल- ८४करवीर- ३३४, पन्हाळा- ११७, राधानगरी- ६४, शाहूवाडी – ७६, शिरोळ – ७८, नगरपरिषद क्षेत्र- ९८, इतर जिल्हा व राज्यातील- ४३ अशा १६७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ६६, ५६९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ४७, ८९४  

मृतांची संख्या, ८९६

उपचार सुरू असलेले रुग्ण१३, ७७९