व्याधीग्रस्त ६२३ नागरीकांपैकी २० पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संजीवनी अभियानाअंतर्गत शनिवारी ६३०५ नागरीकांची ११ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करण्यात आली. या सर्व्हेमध्ये आज व्याधीग्रस्त ६२३ नागरीकांपैकी २० पॉझिटिव्ह व ६०३ निगेटिव्ह आढळून आलेत. यावेळी ६०७४ व्याधीग्रस्त नागरीकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोवीड सदृश्य लक्षणे असणारे ७८ नागरीक आढळून आले. तर ८८४ व्याधीग्रस्त नागरीकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या शनिवारी ११… Continue reading व्याधीग्रस्त ६२३ नागरीकांपैकी २० पॉझिटिव्ह

…यामुळेच सरकारी यंत्रणे वरील भार कमी होत आहे – शौमिका महाडिक

टोप (प्रतिनीधी) : ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोना हा पाय पसरत असुन जिल्ह्यात बेडची संख्या कमी पडत आहे. बेड विना रूग्णांचे हाल होताना दिसत आहेत पण समाजातील काही दानशूर व्यक्ती एकत्र येवून कोविड सेंटर सुरु करत आहेत यामुळे सरकारी यंत्रणे वरील भार कमी होत आहे असे मत भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा व जि.प. माजी अध्यक्षा… Continue reading …यामुळेच सरकारी यंत्रणे वरील भार कमी होत आहे – शौमिका महाडिक

मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी हेमंत निकम

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी हेमंत आबासाहेब निकम यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी त्यांनी पदभार स्विकारला. नगरपालिकेच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले .यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार, नामदेवराव मेडके, सौ. रेखा मांगले, संदीप कलकुटगी,विरोधी पक्षनेते राहुल वंडकर, सुहास खराडे, एम. डी. कांबळे, रविंद्र परीट, प्रतिभा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

कर्तव्यात कसूर करणाऱ्या २० लॅबना जिल्हा परिषदेच्या नोटीसा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिनांक २५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत ICMR पोर्टलवरील कोविड-१९ RT PRCR चे १८७७ आणि RAT चे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर २० लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नोटीसा बजाविल्या आहेत. यामध्ये RAT ( रॅपीड अँन्टीजेन टेस्ट… Continue reading कर्तव्यात कसूर करणाऱ्या २० लॅबना जिल्हा परिषदेच्या नोटीसा

महाविकासआघाडीत मिठाचा खडा टाकू पाहणाऱ्यांना शिवसेना प्रमुखांनी वेळीच आवर घालावी – तौफिक मुल्लाणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना शहरप्रमुख रवीकीरण इंगवले यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचेवर पून्हा एकदा बेछूट बिनबूडाचे आरोप केले. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना पालकमंत्री यांचेवर टीका करणे हे कशाचे द्योतक आहे ? यामागील गौडबंगाल काय आहे ? याचा विचार करण्याची गरज आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे… Continue reading महाविकासआघाडीत मिठाचा खडा टाकू पाहणाऱ्यांना शिवसेना प्रमुखांनी वेळीच आवर घालावी – तौफिक मुल्लाणी

पंतप्रधान मोदींनी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण करण्याची गरज – हसन मुश्रीफ

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे व्यापक राष्ट्रीय धोरण तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. येत्या सहा महिन्यांच्या आत प्रत्येक नागरिकाला लस मिळेल याचे नियोजन करा, असेही ते म्हणाले सेनापती कापशी ता. कागल येथे कोरोना आढावा बैठकीत मुश्रीफ बोलत होते. यावेळी सेंट झेवियर स्कूलच्या 2006 सालच्या… Continue reading पंतप्रधान मोदींनी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण करण्याची गरज – हसन मुश्रीफ

‘फक्त ६ मिनिट चालायला लागतय’ अंतर्गत डॉ. बलकवडे यांच्या सोसायटींना भेटी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आणि उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत शहरात सोसायटींना भेट देऊन “चला कोल्हापूर…चालायला लागतंय फक्त सहा मिनिटे आपल्या आरोग्यासाठी” ही संकल्पना घेऊन अभियान राबविण्यात आले. या अभियानाला सोसायटीमधील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी २०४ इतक्या नागरीकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. यामध्ये १० ऑक्सजन लेव्हल कमी असलेले नागरीक आढळून आले.… Continue reading ‘फक्त ६ मिनिट चालायला लागतय’ अंतर्गत डॉ. बलकवडे यांच्या सोसायटींना भेटी

महापालिकेच्या संजीवनी अभियानांतर्गत २७ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संजीवनी अभियानाअंतर्गत शक्रवारी ५९९४ नागरीकांची ११ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करण्यात आली. या सर्व्हेमध्ये आज व्याधीग्रस्त ६९४ नागरीकांपैकी २७ पॉझिटिव्ह व ६६७ निगेटिव्ह आढळून आलेत. यावेळी ५६९६ व्याधीग्रस्त नागरीकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोवीड सदृश्य लक्षणे असणारे ६३ नागरीक आढळून आले. तर ७३६ व्याधीग्रस्त नागरीकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या शक्रवारी ११… Continue reading महापालिकेच्या संजीवनी अभियानांतर्गत २७ जण पॉझिटिव्ह

कामगारांना वेतन न दिल्यास जितेंद्र सिंग कंपनीचे वाहन रस्त्यावर फिरु देणार नाही – प्रविणसिंह पाटील

मुरगूड (प्रतिनिधी) : कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्यांचा थकलेला पगार त्वरीत द्यावा,त्यांना कामावर घ्यावे अन्यथा जितेंद्र सिंग कंपनीच्या एकाही वाहनाचे चाक या रस्त्यावर फिरु देणार नाही. मोठ जनआंदोलन करु असा इशारा मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिंह पाटील यांनी ‘लाईव्ह मराठी’शी  बोलताना दिला आहे. देवगड निपाणी राज्यमार्ग तयार करण्यासाठी जितेंद्र सिंग या कंपनीला… Continue reading कामगारांना वेतन न दिल्यास जितेंद्र सिंग कंपनीचे वाहन रस्त्यावर फिरु देणार नाही – प्रविणसिंह पाटील

‘मी फॅमिली डॉक्टर एक हात विश्‍वासाचा’ मोहिमेत सहभागी व्हावे – डॉ. प्रदीप पाटील

टोप (प्रतिनिधी) : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी  सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असून आम्ही  ‘मी फॅमिली डॉक्टर एक हात विश्‍वासाचा’ ही  मोहिम राबवित असून जनरल प्रॅक्टिशनरनी या मोहिमेत सहभागी होवून कोरोनाच्या विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले. मोहिमे अंतर्गत… Continue reading ‘मी फॅमिली डॉक्टर एक हात विश्‍वासाचा’ मोहिमेत सहभागी व्हावे – डॉ. प्रदीप पाटील

error: Content is protected !!