‘मिशन संवेदना’ उपक्रमाला पोलीस दलातून चांगला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू झालेला ‘मिशन संवेदना’ उपक्रमास पोलीस दलातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आज (शनिवार) सांगली फाटा येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी एका बेशुद्ध अवस्थेत असलेल्या फिरस्त्याला सेवा रुग्णालयात दाखल करून जीवदान दिले. तर या उपक्रमामुळे शेकडो गरजूंना जीवनावश्यक वस्तू मिळत… Continue reading ‘मिशन संवेदना’ उपक्रमाला पोलीस दलातून चांगला प्रतिसाद

कणेरीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांची वणवण…

कोतोली (प्रतिनिधी) ; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा म्हणून पन्हाळा तालुक्यातील कणेरी येथे 94 लाख रूपये खर्च करून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, ग्रामपंचायतीच्या अणागोंदी कारभारामुळे येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी सध्या वणवण फिरावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. नागरीकांना पाणी विकत घ्यावे  लागत होते. यावर उपाय… Continue reading कणेरीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांची वणवण…

कोरोनाच्या काळात काम करणाऱ्यांसाठी लताई रोटी बँकेचा अनोखा उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकजण काम करीत आहेत. यासाठी कोल्हापुरातील अनेक सामाजिक संस्था या लोकांची काळजी घेत आहेत. एक माणुसकीचा हात म्हणून लताई रोटी बँक संस्थेने पोलिस, प्रशासन कर्मचारी, तसेच फिरस्त्यांना आज (शनिवार) डोसा, सांबर आणि चटणीची खास मेजवानी दिली. यावेळी लता आईंनी मायेचा हात म्हणून स्वतः जाऊन पोलिसांना… Continue reading कोरोनाच्या काळात काम करणाऱ्यांसाठी लताई रोटी बँकेचा अनोखा उपक्रम…

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २,२४० जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शनिवार) दिवसभरात २,२४० जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासात १,५७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.  ५,९३४ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३५६, आजरा तालुक्यातील ३४, भुदरगड तालुक्यातील ३५, चंदगड तालुक्यातील ३८, गडहिंग्लज तालुक्यातील ६९, गगनबावडा तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २,२४० जण कोरोनामुक्त

जाणीव फौंडेशन, वुई केअर फौंडेशनचा सामाजिक उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर शहरातील फिरस्ते, गरीब, गरजू, रोजंदारी कामगार, विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जाणीव फौंडेशन आणि वुई केअर सोशल फौंडेशनकडून या गरजूंना जेवण दिले जात आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, दसरा चौक, सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोलपंप रोड, पंचगंगा नदी परिसर, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, व्हिनस कॉर्नर, बाबुजमाल दर्गा परिसर… Continue reading जाणीव फौंडेशन, वुई केअर फौंडेशनचा सामाजिक उपक्रम…

सिद्धगिरी हॉस्पिटलला पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील ओव्हरसिझ पॉलिमर कंपनी प्रा ली. यांच्याकडून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान करण्यात आले. सिद्धगिरी हॉस्पिटल गेली १० वर्ष गरजू रुग्णांची अविरत सेवा करत आहे. त्यामुळे अशा संस्थेच्या मार्फत गरजू कोविड रुग्णांसाठी आम्ही ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सिद्धगिरी हॉस्पिटलला देत आहोत असे ओव्हरसिझ पॉलिमर कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या… Continue reading सिद्धगिरी हॉस्पिटलला पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल (शुक्रवार) जलव्यवस्थापन बैठकीला उपस्थित असलेल्या या पदाधिकाऱ्याला सर्दी, ताप आणि खोकला ही कोरोनासदृष्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) केली होती. या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत खळबळ उडाली… Continue reading कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

गडहिंग्लज येथे मुश्रीफ यांची आढावा बैठक…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्याचा कोरोना दर आटोक्यात आला तरी गडहिंग्लज उपविभागाची परिस्थिती अद्याप चांगली नाही. ऑगस्टमध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून उपजिल्हा रुग्णालय अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ना. हसन मुश्रीफ यांनी, येथील उपजिल्हा रुग्णालयाची १०० बेडची क्षमता २०० बेड… Continue reading गडहिंग्लज येथे मुश्रीफ यांची आढावा बैठक…

पाटणे फाटा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई…

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मे पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारला गेला आहे. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा बरेच लोक विनामास्क तसेच कोणतेही काम नसताना गाडी घेऊन फिरताना दिसतात. काही शेतकरी हे खोटे कारण सांगून पोलिसांवर दबाव आणायचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन दिवसांत… Continue reading पाटणे फाटा येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई…

सोमवारपासून पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरु राहण्याचे संकेत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये सुरू असणारे कडक लॉकडाऊन रविवारी (दि. २३) रात्री १२ पासून शिथिल होणार आहेत. सोमवार (दि. २४) पासून राज्य शासनाच्या नियम आणि पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीसांनी  कारवाई केली. दरम्यान, हे लॉकडाऊन वाढणार अशी… Continue reading सोमवारपासून पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरु राहण्याचे संकेत…

error: Content is protected !!