कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर (वय 21) हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड बसमधून कुरुंदवाड बसस्थानक येथे आला होता. त्यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी 34 हजार रुपयांच्या गांजासह त्याला ताब्यात घेतले आहे.

ऋषिकेश वडर याची टाकळीवाडी येथे पानपट्टी असून तो पानपट्टीमध्ये गांजाची विक्री करतो. विक्री करण्यासाठी मिरज येथून 34 हजार रुपये किंमतीचा 1 हजार 700 ग्रॅम गांजा खरेदी करून वडार हा मिरज-कुरुंदवाड बसने कुरुंदवाड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार सपोनि रविराज फडणीस यांच्या पथकाने बसस्थानका जवळ सापळा रचला. शिकलगार वसाहत ते शिवतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडर याला गांजासह रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप, संतोष साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी, फारुख जमादार, बाळासो कोळी, विवेक कराडे यांनी केली.