गारगोटी (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस भुदरगड तालुक्यात कोरोनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार दिनांक १५ मे २०२१ अखेर ३९४ लोकांना कोरोनाची बाधा झाली. गारगोटीत सापडलेल्या व उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत पेशंटची संख्या ८९ झाली आहे. ही परिस्थीती भयावह असल्याने तालुक्यातील कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन भुदरगड तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ सचिन यत्नाळकर यांनी केले आहे. यावर्षीची कोरोना बाधित लोकांची संख्या १०३६ इतकी झाली आहे .यातील २८ लोक मयत आहेत.

१०० टक्के लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली असून रस्त्यावरची वर्दळ पुर्ण कमी झाली आहे. त्यातच वारा पाऊस थंड हवा यामूळे आज तालुक्यात कोणीही घराबाहेर आल्याचे दिसून आले नाही. अशा पध्दतीने लॉकडाऊन केले तरच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे.

काल दिनांक १५ मे २०२१ अखेर गावनिहाय उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित लोकांची संख्या चिंताजनक आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यावर कोरोनाची लागण झाली आहे. कलनाकवाडी व मडिलगे बु. येथे १७ तर बारवे येथे १६ व दोनवडे गावचे १५ कोरोनाबाधित गारगोटी कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. इतर गावनिहाय  आकडेवारी पुढीलप्रमाणे – निळपण १३, मडूर ११,पाचवडे ११, आकुर्डे १०, म्हसवे १०, महालवाडी ९, वेसर्डे ९, आरळगुंडी ८, खानापूर ७, कोळवण, ममदापूर, पारधेवाडी व शेणगांव येथे प्रत्येकी ५, आदमापूर, बोंगार्डेवाडी, हणबरवाडी, कूर, मानवळे, पांगिरे फणसवाडी, पुष्पनगर शेळोली एरंडपे, नाधवडे या गावी प्रत्येकी ४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. पळशिवणे, फये, देवकेवाडी, कडगांव, मेघोली पिंपळगांव येथे प्रत्येकी ३ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. आंबवणे, बामणे, भेंडवडे,गडबिद्री, कारिवडे, मिणचे बु,नांगरगांव, पाटगांव, राणेवाडी,थड्याचीवाडी, टिक्केवाडी, म्हासरंग, वाघापूर या गावी प्रत्येकी २ पेशंट नव्याने कोरोनाने बाधित झाले आहेत. बसरेवाडी, चांदमवाडी, दारवाड, डेळे, देवूळवाडी, गंगापूर, दिंडेवाडी, गिरगांव, हेदवडे, करडवाडी, करंबळी, खेगडे, कोनवडे,मुदाळ नांदोली, निष्णप, पाचर्डे, पडखंबे, पोवारवाडी, सालपेवाडी, शिंदेवाडी, सिमालवाडी, सोनारवाडी, तळकरवाडी, तिरवडे, उकीरभाटले, वरेरकरवाडी, वरपेवाडी व वेंगरूळ या गावचा प्रत्येकी १ कोरोनाबाधित गारगोटी कोविड सेंटर ला उपचार घेत आहे. इतर तालुक्यातील १५ लोक कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. कोरोनाची मोठी संख्या चिंताजनक आहे. कोरोनाला आवर घालायचा तर लोकांनी घरातच थांबणे काळाची गरज बनली आहे.