Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#election Archives -

ईव्हीएम विरोधात आंदोलन ; विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही भारतीय यांच्या वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचावच्या मागणीला आज कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं पहायला मिळालं. या आंदोलनादरम्यान बाबा इंदूलकर, कॉ. चंद्रकांत यादव, राष्ट्र सेवा… Continue reading ईव्हीएम विरोधात आंदोलन ; विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी..!

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदर आदेशान्वये, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी… Continue reading मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरी च्या भाषेला मतातून उत्तर देईल : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे. त्यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी मारहाण, दडपशाही केली. पण त्या कुटुंबाने त्यांना चोख उत्तर दिले. मतदानाच्या दिवशी सुद्धा क्षीरसागर यांनी टाकाळा येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला . पण बॉडीगार्डला सोबत घेऊन पैसे वाटणाऱ्या क्षीरसागरांना… Continue reading कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरी च्या भाषेला मतातून उत्तर देईल : आ. सतेज पाटील

जिल्ह्यात ‘करवीर’ ने मारली बाजी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभर विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडी, महायुती आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू होती. काल अखेर तो मतदानाचा दिवस उजाडला अन् जिल्ह्यात मोठया उत्साहात मतदारांनी मतदान केलेलं पहायला मिळालं. यंदाही राज्यात सर्वांधिक टक्केवारीने जिल्हयात 76 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघानुसार मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – चंदगड – 74.61राधानगरी – 78.26कागल – 81.72कोल्हापूर… Continue reading जिल्ह्यात ‘करवीर’ ने मारली बाजी..!

मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर मधील समस्त मतदारांचा मी शतशः आभारी आहे. महायुती सरकारने विविध योजना सुरू करून सर्व घटकांना न्याय दिल्याने सर्वच मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. मतदानासाठी जनतेचा प्रतिसाद पाहून मला विजयाची खात्री असल्याचे कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. गेल्या… Continue reading मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार : राजेश क्षीरसागर

मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धैर्यप्रसाद हॉल येथे जमत ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. तर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना निकाला आधीच गुलाल लावत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि… Continue reading मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश

शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

शिरोळ (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने 280 – शिरोळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या शिरोळ तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांचे मतदान केंद्राध्यक्ष यांनी गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दिव्यांग मतदारांचे मतदान झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजाविल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले आले. दिव्यांगांना… Continue reading शिरोळ तालुक्यामध्ये मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मतदारांचे स्वागत

सरपंच संगिता नरदे यांचे मतदान करण्यासाठी आवाहन

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी तालुका हातकणंगले येथे एकूण 5 हजार 700 मतदान असून दुपारपर्यंत 6 बूथवर एकूण 2 हजारांचे आसपास मतदान झालेले आहे. एकूण टक्केवारीच्या 50 टक्के मतदान झालेले आहे. रांगोळीच्या सरपंच संगीता नरदे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. रांगोळी गावात शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात असल्यामुळे मतदानाला दुपारी 4 नंतर गर्दी… Continue reading सरपंच संगिता नरदे यांचे मतदान करण्यासाठी आवाहन

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 6 तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- 271- चंदगड – 39.19 टक्के272- राधानगरी – 42.82… Continue reading जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान

जिल्हयातील सर्वांधिक मतदान ‘या’ मतदारसंघात..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वा. पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झालेली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – 271- चंदगड – 6.78 टक्के272- राधानगरी – 6.67… Continue reading जिल्हयातील सर्वांधिक मतदान ‘या’ मतदारसंघात..!

error: Content is protected !!