कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरनोबतवाडी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विवाहित महिलेचे नाव वर्षा निलेश वसव ( वय 34 ) राहणार सरनोबतवाडी या महिलेने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ही महिला फुलांचे डेकोरेशन मॅनेजमेंटचा व्यवसाय करते त्यांना 14 वर्षाचा मुलगा व अकरा वर्षाची मुलगी आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून वर्षाही पतीच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त असल्याने ती विभक्त खात होती. अशी माहिती देखील समोर आली आहे.

मात्र या प्रकाराने सरनोबतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसात तक्रार दाखल करताना नातेवाईकांनी याबाबतचा सखोल तपास झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे.