टोप (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (रविवार) शिये-कसबा बावडा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन संपताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन ऊसाची तोडणी बंद पाडली.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी, जोपर्यंत उसाला दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी तसेच कारखाने चालू देणार नाही. शेतकरी बांधवांनी लवकर ऊस तोडणीचा निर्णय घेवू नये. आपल्या निर्णयामुळे कारखानदारांचा फायदा होत असून आपले नुकसान होत आहे. हे आंदोलन आपल्या घामाच्या दामासाठी असल्याचे ते म्हणाले.


यावेळी ऊसतोड मजूरांना समज देत आपल्या गाड्यांच्या होणाऱ्या नुकसानीसही तुम्हीच जबाबावर असणार असल्याचे सांगितले. या आंदोलनामुळे शिये-कसबा बावडा मार्गावर कांहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.