कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगेल लोकसभेसाठी लढत नेमकी कशी होणार ? यावर स्पष्टता येत न्हवती. मात्र आज महाविकास आघाडीने आपली भुमिका स्पष्ट करत सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत ही चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना आता एकला चलो ची भुमिका पार पाडावी लागणार आहे. तसेच वंचित बहूजन आघाडीसह, महायुतीतील नेत्यांना ही मतदानासाठी आपली ताकद आजमावावी लागणार आहे. तर वंचित बहूजन आघाडी गतवेळपेक्षा अधिक कीती मते अधिक घेणार यावर त्यांची ही वाटचाल ठरणार आहे.