कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडी देखील मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

तर दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील हे मात्र अतिशय साध्या पद्धतीने पाच लोकांना घेऊन उमेदवारी अर्ज भरणार आहेत.