कसबा बावडा (प्रतिनिधी) :  मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी ५ वेळा पाण्याखाली गेला. यावर्षी आतापर्यंत राजाराम बंधारा ६० दिवस पाण्याखाली राहिला आहे. आज (गुरुवार) बंधाऱ्याचे पाणीपातळी १७ फूट ३ इंच इतकी आहे. यंदा १ जून ते १५  ऑक्टोबर या १३५ दिवसात एकूण ६० दिवस हा बंधारा पाण्याखाली राहिला आहे.