कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वृद्ध कैद्याचा आज शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनवर अली अन्सारी (वय ७३, रा. झाकुरिया बंदर, शिवडी, मुंबई) असे मृत कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईतील अनवर अन्सारी हा एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. प्रकृती अस्वस्थ्यामूळे २७ सप्टेंबर रोजी कारागृह प्रशासनाने उपचारासाठी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज अन्सारी याचा मृत्यू झाला. याबाबतची जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.