मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं रणांगण सुरु झाले आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून विधानसभेसाठी जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विधानसभेच्या अनुषन्गाने उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना सक्तीची सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माविआने बाजी मारल्यानंतर भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले होते. ती चूक पुन्हा होता काम नये यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध झाले आहेत.देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच भाजपची एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

विधानसभेसाठी भाजपने कंबर कसली

विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे विधानसभेत अशाप्रकारे जर नरेटिव्ह आले, तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.