पंतप्रधानांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे : उद्धव ठाकरे

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे. तुम्ही आमचे पालक आहात. पालक असल्यासारखे बोला, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. मराठवाडा साहित्य संमेलन शनिवारी सुरु झाले. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची… Continue reading पंतप्रधानांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे : उद्धव ठाकरे

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने नवा वाद पेटणार

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली… Continue reading चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानाने नवा वाद पेटणार

पंतप्रधान मोदींनी बजावला मताधिकार

दिल्ली (वृतसंस्था) : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुरवात झाली असून ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. यात ८३३ उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यात अपक्षांची संख्या २८५ आहे. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ९ च्या सुमारास गांधीनगर राजभवन येथून निशान पब्लिक स्कूल राणीप येथे जाऊन आपला मताधिकार बजावला आणि नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केले. गुजरात… Continue reading पंतप्रधान मोदींनी बजावला मताधिकार

राज्यपालांविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा : उदयनराजे

रायगड (प्रतिनिधी) : राज्यपालपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने जर शिवरायांबद्दल अशाप्रकारे वक्तव्य केले असेल तर गप्प बसणार का? आझाद मैदान फार लांब नाही, लवकरच एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानात राज्यपालांविरोधात मोर्चा काढणार अशी घोषणा खासदार उदयनराजे यांनी केली आहे. ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे आज रायगडावर दाखल झाले असून त्यांनी शिवरायांच्या समाधीला वंदन केले.… Continue reading राज्यपालांविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा : उदयनराजे

‘ती’ जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय : नीलम गोऱ्हे

सोलापूर (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय. त्यामुळे ते अशाप्रकारची बेताल टीका करतात. अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जे व्यंग नाहीत त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची याला दूषित… Continue reading ‘ती’ जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय : नीलम गोऱ्हे

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू

पंढरपूर (प्रतिनिधी) : मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना काल रात्री एक फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्याने ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्याला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना… Continue reading ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू

संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते सांगूच : केसरकर

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : ‘ज्यांनी जीवन वेचले, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील बोलू. शिवाय सततच्या बदनामीमुळे आमचा देखील संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगितले जाईल. फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेलं हे देखील… Continue reading संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते सांगूच : केसरकर

देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा : उद्धव ठाकरे

बुलढाणा (वृत्तसंस्था) : देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, असे म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीची क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना धारेवर धरले. उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्याच्या चिखली येथील सभेत ते बोलत होते. आज डीपी जळतायत, किती लोक तुमच्याकडे मदतीला येत आहेत. डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला… Continue reading देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा : उद्धव ठाकरे

आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो, पण…. : उद्धव ठाकरे

बुलडाणा (वृत्तसंस्था) : आपल्या सरकार काळात आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो. पण शिंदे गटात गेलेल्यांमुळे ते शक्य होऊ शकले नाही. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मी मुख्यमंत्री असतो, तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ दिली नसती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज… Continue reading आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो, पण…. : उद्धव ठाकरे

शहीद अशोक कामटे यांची साकारली प्रतिमा

सोलापूर (प्रतिनिधी) : मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षं उलटली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांना वीरमरण आले. त्यांना श्रद्धांजली म्हणून २६ नोव्हेंबरला स्पर्शरंग कला परिवाराने सोलापूर पोलीस मुख्यालयात कामटे यांची ७० फुटांची दगडी खडीपासून बनवण्यात आलेली प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा तयार करण्यासाठी… Continue reading शहीद अशोक कामटे यांची साकारली प्रतिमा

error: Content is protected !!