‘राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोहत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी ‘राष्ट्रीय युवा पुरस्कारा’चे वितरण केले जाते. सन २०२०-२१ या वर्षाकरिता दि १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्थांचे नामांकन अर्ज, प्रस्ताव http://awards.gov.in या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन भरावेत,… Continue reading ‘राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत’

कोल्हापूरच्या तीन रग्बीपटूंची भारतीय संघात निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उझबेकिस्तान येथे होणाऱ्या २० वर्षांखालील आशियाई सातव्या आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल वोट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. यात तेजस पाटील (खुपिरे), प्रणव पाटील (कोपार्डे) व प्रथमेश पाटील (भाटणवाडी) यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठीची निवड चाचणी ओडिशा (भुवनेश्वर) येथे झाली. यासाठीच्या सराव शिबिरात विविध राज्यांतून ४४ खेळाडूंनी सहभाग… Continue reading कोल्हापूरच्या तीन रग्बीपटूंची भारतीय संघात निवड

रंगतदार सामन्यात भारताचा निसटता विजय

अ‌ॅडलेड : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. पावसाने रोमांचक झालेल्या या सामन्यात प्रत्युत्तरात बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार १६ षटकांत ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. या विजयामुळे उपांत्य फेरीतील भारताचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. भारताने या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी १८५… Continue reading रंगतदार सामन्यात भारताचा निसटता विजय

भारताचे बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य

अ‌ॅडलेड :  येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश सामन्यात टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत. विराट (नाबाद ६४) आणि के.एल. राहुलने (५०) अर्धशतक ठोकल्यामुळे भारतानं ही धावसंख्या उभारली आहे. टीम इंडियाने आजच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये एक बदल केला आहे. दीपक हुड्डा ऐवजी अक्षर पटेलला… Continue reading भारताचे बांगलादेशला विजयासाठी १८५ धावांचे लक्ष्य

भारताचा बुधवारी बांग्लादेशविरुद्ध महत्त्वाचा सामना

पर्थ (वृत्तसंस्था) : भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आता बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडच्या मैदानावर बुधवार, दि. २ नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या सुपर १२ मधील लढती आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. उपांत्य फेरीचे चित्र कसे असेल हे स्पष्ट होत असून, ग्रुप २ मधून उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाची… Continue reading भारताचा बुधवारी बांग्लादेशविरुद्ध महत्त्वाचा सामना

पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी कोल्हापूरच्या स्वरुप उन्हाळकरची निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई संयुक्त अरब अमीरात येथे ३ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी कोल्हापूरचा पॅरा नेमबाज स्वरुप उन्हाळकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये स्वरूप १० मी. एअर रायफल, एअर प्रोन, एअर रायफल मिक्स व ५० मी प्रोन या प्रकारात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून पॅरिस २०२४ या पॅरालिम्पिक… Continue reading पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी कोल्हापूरच्या स्वरुप उन्हाळकरची निवड…

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाची शक्यता?

पर्थ (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा तिसरा सामना रविवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यालाही हवामानाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र क्रिकेट चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे सामन्यात पाऊस पडला नाही. आता पर्थमध्ये… Continue reading भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाची शक्यता?

राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२  निमित्ताने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना मार्फत राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल मैदान, राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी.शिर्के व आमदार ऋतुराज पाटील… Continue reading राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ

नेट रन रेटवर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार

सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यामुळे आता पाकिस्तानचे उपांत्यफेरीतील स्वप्न धुसर झाले आहे. मात्र नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तानला अजूनही या स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. आपले उर्वरित सर्व सामने जिंकणे, भारताने त्यांचे सर्व सामने जिंकणे, दक्षिण आफ्रिकेचा आणि झिम्बाब्वेचा त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी किमान दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यास पाकिस्तानला… Continue reading नेट रन रेटवर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार

भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय

सिडनी : भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारताला अखेरच्या षटकावर पाकिस्तानवर विजय मिळवता आला होता. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १२३ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि अश्विनने २-२ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमीने एक… Continue reading भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय

error: Content is protected !!