सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी ११ भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सव !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्र आणि धर्म संकटात असताना धर्मसंस्थापनेचे कार्य गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि रामराज्यासारख्या ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाच आहे. या उद्देशाने २३ जुलै रोजी सनातन संस्था अन् हिंदू जनजागृती समिती यांच्या… Continue reading सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी ११ भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सव !

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे…

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे, यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) आषाढी एकादशीच्या महापूजेच्यावेळी श्री पांडुरंगाला घातले. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने… Continue reading पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे…

यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना…

कोल्हापूर (विवेक जोशी)  : श्री विठ्ठल, पांडुरंग म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत. सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेच्या काठी, विटेवर विसावलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त, वारकरी येत असतात. जातां पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे असे म्हणत महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून निघून लाखो भाविक, वारकरी विठ्ठल… Continue reading यंदाही चंद्रभागेचा काठ सुनासुना…

कीर्तनकार बंडातात्या कराडकर स्थानबद्ध : वारकऱ्यांमध्ये संताप

पुणे (प्रतिनिधी) : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना आज (शनिवार) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्थानबद्ध (नजरकैद) केले आहे. पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी-पंढरपूर चालत जाणारच, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी… Continue reading कीर्तनकार बंडातात्या कराडकर स्थानबद्ध : वारकऱ्यांमध्ये संताप

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध करून  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असं आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती… Continue reading गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

आषाढीवारीसाठी नियमावली जाहीर : देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढीवारीसाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने आज  (मंगळवार) नियमावली जाहीर केली आहे. देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. देहू… Continue reading आषाढीवारीसाठी नियमावली जाहीर : देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी

आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

पुणे (प्रतिनिधी) : मागील वर्षीप्रमाणे यंदाही आषाढीवारीवर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळेही मागील वर्षाप्रमाणे सर्व सोहळे प्रमुखांना पादुका बसमधून नेण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला. मात्र सर्व सोहळेप्रमुखांनी त्याला नकार दिला आणि पायी वारी करण्याची भूमिका घेतली. शासनाने यावर समिती नेमली आणि समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला. यावर निर्णय येण्यापूर्वीच वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी… Continue reading आषाढीवारीवरून वारकरी संप्रदाय आक्रमक : बंडातात्या कराडकरांचा सरकारला इशारा

पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द

बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील प. पू. सदगुरू चिले महाराज समाधी मंदिर येथे होणारा भंडारा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी पैजारवाडी येथील सदगुरू चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात भंडारा महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास हजारो भक्तांची गर्दी… Continue reading पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द

श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. देवाचा पालखी सोहळा २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मात्र या मानकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. विनय कोरे आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी लाखो भक्तांच्या… Continue reading श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

शहापूरची म्हसोबा देवस्थान यात्रा भाविकांसाठी रद्द…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूरचे ग्रामदैवत व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा देवाची यात्रा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी मोजक्याच लोकांच्या आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. कोरोना महामारी व वाढती रुग्णसंख्या या सर्व गोष्टींचा विचार करून शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव… Continue reading शहापूरची म्हसोबा देवस्थान यात्रा भाविकांसाठी रद्द…

error: Content is protected !!