शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून…: संतप्त फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

मुंबई (प्रतिनिधी) : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घ्यावी. त्याच्यावर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पुणे येथे ३० जानेवारी २०२१… Continue reading शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून…: संतप्त फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

शेतकऱ्यांसाठी शिवसेना थेट गाझीपूर सीमेवर..!

दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर काही संघटनांनी माघार घेतल्यामुळे आंदोलन थंडावेल असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा या आंदोलनाने जोर धरला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी आज गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी… Continue reading शेतकऱ्यांसाठी शिवसेना थेट गाझीपूर सीमेवर..!

राजेश क्षीरसागरांचा ना. सतेज पाटलांवर निशाणा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. आज (मंगळवार) शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आम्ही कोणाच्या कार्यक्रमाची भाषा करणार नाही, असे म्हणत क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर बोचरी टीका केली.… Continue reading राजेश क्षीरसागरांचा ना. सतेज पाटलांवर निशाणा…

महापालिका निवडणूकीत आम्ही सर्व मार्ग अवलंबणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत पैशांचा वापर केला जातो. आम्हीही यावेळी सर्व मार्ग अवलंबणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. क्षीरसागर म्हणाले की, महापालिकेच्या राजकारणात यावेळचे राजकारण बदलले आहे. शिवसेनेत चांगले वातावरण आहे. कोणतीही गटबाजी नाही. पक्षात सकारात्मकतेचे वारे आहे. विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या पराभवास माझ्याच चुका… Continue reading महापालिका निवडणूकीत आम्ही सर्व मार्ग अवलंबणार : राजेश क्षीरसागर

आंदोलक शेतकरी हिंदू नाहीत का..?

मुंबई (प्रतिनिधी) : नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संतापले. शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत, असे सांगतानाच आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का? असा संतप्त सवाल नवाब मलिक… Continue reading आंदोलक शेतकरी हिंदू नाहीत का..?

‘त्या’ व्हायरल फोटोवर अनिल देशमुखांचा खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद दौऱ्यावर गेलेले  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यावर  देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. औरंगाबादला दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी येत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते.… Continue reading ‘त्या’ व्हायरल फोटोवर अनिल देशमुखांचा खुलासा

बजेट देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नव्हे ! : मुख्यमंत्र्यांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (सोमवार) २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बजेट देशासाठी पाहिजे होते, निवडणुकांसाठी नव्हे, अशी मार्मिक टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, त्याचबरोबर अधिक माहिती घेऊनच यावर सविस्तर… Continue reading बजेट देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नव्हे ! : मुख्यमंत्र्यांची टीका

सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आली आहे. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्याला काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष… Continue reading सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका

‘बजेट’वर मंत्री मुश्रीफांची गंभीर टीका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महाराष्ट्राची निराशा केली आहे. केंद्राकडून राज्याच्या जीएसटीचे ३८ हजार कोटी अद्याप येणे बाकी आहे. मात्र, एखाद्या विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याला त्रास कसा द्यायचा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले,… Continue reading ‘बजेट’वर मंत्री मुश्रीफांची गंभीर टीका

‘बेळगांव आमच्या हक्काचं’… : गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा…(व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेसवर निपाणी येथे काल (रविवार) गडहिंग्लज कर्नाटकात सामील करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले. त्यामुळे गडहिंग्लजमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. याचा निषेध करण्यासाठी आज (सोमवार) गडहिंग्लजमध्ये जनता दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जनता… Continue reading ‘बेळगांव आमच्या हक्काचं’… : गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा…(व्हिडिओ)

error: Content is protected !!