चांदी कारागिरांना असंघटित कामगार महामंडळामध्ये समाविष्ट करा : राष्ट्रवादी काँग्रेस    

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरीतील चांदी कारागिरांना नवीन स्थापन होणाऱ्या असंघटित कामगार महामंडळामध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हुपरी शहर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. यात म्हटले आहे की, हुपरी परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून अनेक कामगार येथे काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी व भविष्यातील कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी… Continue reading चांदी कारागिरांना असंघटित कामगार महामंडळामध्ये समाविष्ट करा : राष्ट्रवादी काँग्रेस    

ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे बिकिनीतील फोटो व्हायरल

मेरठ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वपक्षीयांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची लगबग सुरू असताना हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चांना उधाण आले आहे. यावर अर्चना गौतम यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम… Continue reading ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे बिकिनीतील फोटो व्हायरल

पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा? : मनसेचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे, त्यांना एकच प्रश्न आहे. पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, असा सूचक इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत, असा निर्णय बुधवारी घेतला आहे. तर दुसरीकडे व्यापारी मात्र या निर्णयाला विरोध करत आहेत. या… Continue reading पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा? : मनसेचा इशारा

छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार ? : निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका   

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याबाबत मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती दमानिया यांनी ट्विट करून दिली आहे. महाराष्ट्र सदन कथित… Continue reading छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार ? : निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका   

मनसेचा ‘मोठा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

वर्धा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर दौरे सुरू करण्याआधी विदर्भात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत  आहेत.   विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विदर्भातील ओबीसी चेहरा असलेले वांदिले यांचा   मुंबईमध्ये  शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.… Continue reading मनसेचा ‘मोठा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

वडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन सभापतीपदी सुरेश पाटील आणि उप सभापतीपदी जगोड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आज पहिलीच बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर निबंधक… Continue reading वडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड…

भाजपाकडून पन्हाळा नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून अमरसिंह भोसले यांची निवड…

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर भाजपा, जिल्हा ग्रामीण पन्हाळा नगरपालिका (२०२२) निवडणूक प्रभारीपदी अमरसिंह भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रभारी म्हणून सुरेश बेनाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी समरजितसिंह घाटगे, धनंजय महाडिक, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची दोन दिवसांत घोषणा ?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेश, गोव्यासह पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीसोबतच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक… Continue reading कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची दोन दिवसांत घोषणा ?  

भाजपने उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिवसेनेला पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपने आता उपमुख्यमंत्रिपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपला वाटत होतं की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत. पण… Continue reading भाजपने उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिवसेनेला पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

आकसापोटी कुणालाही त्रास देणार नाही : सुधीर देसाई

आजरा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना सुलभ आणि कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांचे राजकीय हितसंबंध पाहता आपण आकसापोटी कुणालाही जाणीवपूर्वक त्रास देणार नाही, असे जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुधीर देसाई यांनी सांगितले. आजरा येथे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. सभापती उदय पवार अध्यक्षस्थानी होते. विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांच्या… Continue reading आकसापोटी कुणालाही त्रास देणार नाही : सुधीर देसाई

error: Content is protected !!