लोकसभेला फक्त पाडा म्हणलोय, विधानसभेला नाव घेऊन पाडणार : मनोज जरांगेंचा इशारा

मुंबई: राज्यात पाचव्या टप्प्यातील लोकसभा प्रचाराची सांगता आज होणार आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत सर्व राजकीय नेत्यांनी जनतेशी संपर्क साधण्याकडे आपला भर दिला. यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटली यांचाही समावेश होता. दरम्यान, चैत्यभूमीला भेट देण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावरून सरकारला… Continue reading लोकसभेला फक्त पाडा म्हणलोय, विधानसभेला नाव घेऊन पाडणार : मनोज जरांगेंचा इशारा

केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

दिल्ली : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे  पीए विभव कुमार याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीये . दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि विभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आलंय. आप खासदार मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अहवालात 2 छायाचित्रांसह… Continue reading केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

कोल्हापुरातील ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ ; राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापूर : कोल्हापुरात  राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलो. पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून काम करत राहिलो. यामुळे कुटुंबाकडे पूर्णपणे… Continue reading कोल्हापुरातील ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ ; राष्ट्रवादीला धक्का

भाजपच्या मनात पाकिस्तानचा झेंडा फडकतोय ; उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई : महाविकस आघाडीच्या नेत्यांनी पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत आज इंडिया आघाडीची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाकिस्तानच्या मुद्द्यावरून घेरले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मनात पाकिस्तानाचा झेंडा फडकत आहे, असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवाज शरीफ… Continue reading भाजपच्या मनात पाकिस्तानचा झेंडा फडकतोय ; उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

तुरुंगातून सरकार चालवले आता लोकशाहीही चालवू : अरविंद केजरीवाल

मुंबई : आम्हाला पराभूत करता येत नाही, म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटले. पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखविले. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू”, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील सभेत दिले.… Continue reading तुरुंगातून सरकार चालवले आता लोकशाहीही चालवू : अरविंद केजरीवाल

रोड शो मोदींचा अन् खर्च पालिकेचा ; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी देशभरात सभा घेत आहेत. महाराष्ट्रातही मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावला होता. तसेच मोदींचा 15 मे रोजी घाटकोपर ते मुंबई असा भव्य रोड शो झाला. या रोडसाठी मुंबई महानगरपालिकेने जवळपास साडेतीन कोटींचा खर्च केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा भाजपाचा… Continue reading रोड शो मोदींचा अन् खर्च पालिकेचा ; संजय राऊतांचा आरोप

नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

मुंबई : नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान… Continue reading नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आजपर्यंत झाला नाही : मल्लिकार्जुन खरगे

भाजपाला आरएसएसची गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे : उद्धव ठाकरे

मुंबई : देशात 20 मे रोजी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात ही 6 जागांसाठी मतदान होत आहे. त्याआधी आज इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. तसेच “भाजपाला एकवेळ RSS ची गरज… Continue reading भाजपाला आरएसएसची गरज नाही, १०० वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे : उद्धव ठाकरे

आमचं सरकार राम मंदिराचं काम पूर्ण करेल ; उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

मल्लिकार्जून खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई : देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान होणार आहे. तर आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी महाविकस आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार… Continue reading आमचं सरकार राम मंदिराचं काम पूर्ण करेल ; उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर

मतदानाच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना धक्का ; ‘या’ नेत्याने सोडली साथ

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना पक्षांतरं,पक्षप्रवेश आणि नाराजीनाट्य सुरुच आहे.कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने शक्ती पणाला लावली असताना हा मोठा धक्का मुख्यमंत्री शिंदे यांना बसला आहे. कल्याणमधील मतदानाला अवघे दोनच दिवस बाकी असताना कल्याण-मुरबाड… Continue reading मतदानाच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना धक्का ; ‘या’ नेत्याने सोडली साथ

error: Content is protected !!