एकाच वेळी ‘इस्रो’ने आकाशात सोडले ९ उपग्रह

श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : ‘इस्रो’ने आज (शनिवार) सकाळी ११.५६ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून उपग्रह प्रक्षेपित केला. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी५४-इओएस-०६ रॉकेटने उड्डाण केले आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-३ उपग्रह आणि ८ नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही २४ वी मोहीम आहे. भूतानसाठी पाठविण्यात आलेला… Continue reading एकाच वेळी ‘इस्रो’ने आकाशात सोडले ९ उपग्रह

पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

हैदराबाद (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचे आहे. या रॉकेटचे नाव विक्रम सबऑर्बिटल असे आहे. निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश… Continue reading पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

मोबाईल स्क्रीनवर दिसणार फोन करणाऱ्याचे नाव

दिल्ली (वृत्तसंस्था) : दररोजच्या येणाऱ्या स्पॅम कॉलच्या त्रासापासून लवकरच मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होणार आहे. स्पॅम कॉल रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने निर्णय घेतला असून, यापुढे फोनवर अज्ञात नंबर नाही, तर फोन करणाऱ्याचे थेट नावच स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे स्पॅम कॉल करणाऱ्यांना चाप बसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना ज्या नावाने फॉर्म भरला ते नाव वापरकर्त्यांना… Continue reading मोबाईल स्क्रीनवर दिसणार फोन करणाऱ्याचे नाव

‘रिअलमी’चा १० प्रो प्लस- ५ जी फोन लवकरच बाजारात

मुंबई (प्रतिनिधी) : चिनी स्मार्टफोन कंपनी रिअलमी लवकरच त्यांची सिरीज १० सादर करत असून, त्यातील रिअलमी-१० व रिअलमी- १० प्रो प्लस मॉडेल्स चिनी वेबसाईटवर दिसली आहेत. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये येईल. त्यात ब्लॅक आणि निळा रंग सामील आहे. दोन स्टोरेज पर्याय दिले गेले आहेत. बेस मॉडेलसाठी ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, तर हायएंड… Continue reading ‘रिअलमी’चा १० प्रो प्लस- ५ जी फोन लवकरच बाजारात

अंतराळातून आलेल्या १८६३ सिग्नल्समुळे एलियन्सच्या वास्तव्याची चर्चा

चंद्रपूर : पृथ्वी वगळता काही ग्रहांवर जीव असू शकतात, याचा शोध शास्त्रज्ञ मागील अनेक वर्षांपासून घेत आहेत. यात त्यांना अद्याप यश आले नाही. अशात शास्त्रज्ञांना अंतराळाच्या एका कोपऱ्यातून अवघ्या ८२ तासांत जवळपास १८६३ सिग्नल्स मिळाले आहेत. यामुळे एलियन्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरंच एलियन असतील आणि ते पृथ्वीवर आक्रमण करतील तर काय होणार? यावर… Continue reading अंतराळातून आलेल्या १८६३ सिग्नल्समुळे एलियन्सच्या वास्तव्याची चर्चा

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली हजारो कोटींचा गैरव्यवहार

दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या काळात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार विशेषत: युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असला तरी या आभासी खेळांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची बाब उघड झाली आहे. अशा अनेक प्रकरणांचा तपास सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत आहे. मोबाईल गेमिंगच्या गैरकारभारात चिनी कंपन्या आघाडीवर असून, त्यांच्यामार्फत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली भारतीय कंपन्यांना… Continue reading ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली हजारो कोटींचा गैरव्यवहार

६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडून तयार होतात स्मार्टफोन

दिल्ली (वृत्तसंस्था) : आजकाल स्मार्टफोन जीवनावश्यक वस्तू बनली आहे. केवळ कॉलिंग साठीच नाही तर प्रोफेशनल कामासाठी सुद्धा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. हे छोटेसे उपकरण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माणसाचे जीवन व्यापून राहिले आहे. अनेक कामे चुटकी सरशी करणारे हे उपकरण तयार कसे होते याची मात्र अनेकांना माहिती नाही. आज बाजारात अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांची विविध… Continue reading ६० पेक्षा अधिक सुटे भाग जोडून तयार होतात स्मार्टफोन

गुगलचा थेट इशारा, क्रोम हॅकर्स घालतायेत गंडा

दिल्ली (वृत्तसंस्था) : जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर तुम्हाला अलर्ट होण्याची आवश्यकता आहे. धोकादायक बगमुळे लोक हैराण झाले आहेत. गुगलने यूजर्सना स्पष्ट सूचना केल्या आहेत की, त्यांनी क्रोम ताबडतोब अपडेट करणे आवश्यक आहे. गुगल क्रोम तुम्ही दररोज वापर करत असाल तर हा अहवाल तुमच्यासाठी महत्वाचा आहे. गुगलने क्रोम यूजर्सना एका धोकादायक बगबद्दल इशारा… Continue reading गुगलचा थेट इशारा, क्रोम हॅकर्स घालतायेत गंडा

देशात १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात येत्या १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा प्रारंभ होईल. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालानुसार 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६.४ ट्रिलियन रुपये (सुमारे ४५५ अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला… Continue reading देशात १ ऑक्टोबरपासून 5G इंटरनेट सेवा

पणुत्रेतील बीएसएनएल टॉवर दहा दिवस बंद

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील तीस ते चाळीस गावांना नेटवर्क पुरवणारा पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील बीएसएनएल कंपनीचा टॉवर गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, महापूर यामुळे आकुर्डे, आंबर्डे पुलासह अनेक ठिकाणी पाणी आल्याने गावांचाही संपर्क तुटला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे या परिसरातील जास्तीत जास्त… Continue reading पणुत्रेतील बीएसएनएल टॉवर दहा दिवस बंद

error: Content is protected !!