पॉर्न व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडिओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून ८५ पॉर्न व्हिडिओ तयार करून साईटवर अपलोड केले जात होते. मुंबई पोलिसांना पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या… Continue reading पॉर्न व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक

नौदलाच्या जवानाची पेट्रोल टाकून जाळून हत्या 

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय नौदलाचा जवान सुरज कुमार दुबे (वय २७) याचे अपहरण करून त्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार पालघर येथून समोर आला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,  शरीर जास्त भाजल्याने त्याला मुंबई येथील नेव्ही हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. सुरज कुमार दुबे आयएनएस कोयंबटूरच्या… Continue reading नौदलाच्या जवानाची पेट्रोल टाकून जाळून हत्या 

सौंदलगाजवळ कारची झाडाला धडक : महिला, मुलगी जागीच ठार

निपाणी (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाजवळ भरधाव कारची झाडाला धडक बसली. या भीषण अपघातात महिला व मुलगी जागीच ठार झाल्या. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.  हा अपघात आज (रविवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. यात लता राजेंद्र पाटील (वय ४०) व अनिषा राजेंद्र पाटील (वय १७) अशी मृत्यू झालेल्यांची नांवे आहेत.  तर अथर्व राजेंद्र… Continue reading सौंदलगाजवळ कारची झाडाला धडक : महिला, मुलगी जागीच ठार

इचलकरंजीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा : अकराजणांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीजवळील कबनूर येथील फरांडे मळ्यातील ओमकार चौकातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अकराजणांना अटक केली. अड्डामालक नाजरुद्दिन जमादार पळून गेला या वेळी चार मोटारसायकलींसह दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाचप्रकरणी गणेश मानेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संस्थेच्या जमिनीचे शासकीय मुल्यांकन करून दाखल देण्याकरिता सहायक नगरचनाकार गणेश माने याला २० लाखांची लाच घेताना लाचप्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली होती. या प्रकरणी आज (शनिवार) विशेष न्यायालयासमोर हजर केले असता माने याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  संस्थेच्या जमिनीचे शासकीय मुल्यांकन करून दाखल देण्याकरिता माने यांने तक्रारदाराकडे ४५ लाख रूपयांची… Continue reading लाचप्रकरणी गणेश मानेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सहायक नगररचना अधिकारी २० लाखांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात (व्हिडिओ)

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक नगररचना अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही आतापर्यंतची सर्वांत कारवाई ठरली आहे.  

शिरोली खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक

टोप (प्रतिनिधी) : दारुची बाटली आणण्यास नकार दिल्यामुळे अमित राठोड याचा चाकूने भोकसून बुधवारी खून केला होता. याप्रकरणी समीर नदाफ (वय २०) आणि योगेश साखरे (वय २०, दोघेही रा. गांधीनगर) यांना काहीच तासातच अटक करण्यात शिरोली आणि गांधीनगर पोलिसांना यश आले. संशयित आरोपींना आज (गुरूवार) पेठवडगांव कोर्टात हजर केले असता त्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी… Continue reading शिरोली खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक

सरनोबतवाडीतील महिलेसोबत ‘त्या’ गँगस्टरचे ‘लिव्ह इन’ 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजस्थान आणि हरियाना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गॅगस्टर पपलाने सरनोबतवाडी येथे बस्तान बसवले होते. येथे एका महिलेसोबत तो राहत होता. मात्र, जिममध्ये गेल्यानंतर त्याची ओळख दुसऱ्या प्रेयसीशी झाली. ही तरुणी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला होती. पहिल्या पतीपासून तिचा घटस्फोट झाला होता. ती जीम चालवत असे. पपलाची ओळख झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. आपण… Continue reading सरनोबतवाडीतील महिलेसोबत ‘त्या’ गँगस्टरचे ‘लिव्ह इन’ 

दाम्पत्याचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील काँग्रेस रोडवरील रेल्वे रुळावर दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे. राकेश पाटील (वय ३५) असे मयत झालेल्याचे नाव आहे. तर अस्मिता पाटील गंभीर जखमी झाल्या आहेत. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल… Continue reading दाम्पत्याचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू

इचलकरंजीतील ‘त्या’ बेपत्ता महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इचलकरंजीतील गांधी कॅम्प परिसरातील राहणाऱ्या सौ. अलका सुभाष रेडेकर यांचा आज (बुधवार) दुपारच्या सुमारास मृतदेह नदीपात्रात जँकवेल शेजारी  आढळून आला.  या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे. सौ. अलका रेडेकर या ३० जानेवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी नातेवाईकांनी गावभाग पोलिस ठाण्यात… Continue reading इचलकरंजीतील ‘त्या’ बेपत्ता महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…

error: Content is protected !!