अवघी करवीर नगरी झाली गणेशमय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विघ्नाहर्त्या गणेशाचे जल्लोषी स्वागतासाठी करवीर नगरीसह जिल्ह्यात सर्व तयारी होत आली असून, सर्वत्र आगमनाची लगबग सुरु आहे. कोरोना काळातील सर्व विघ्नांवर मात करत बाप्पांच्या आगमनाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अवघी करवीर नगरी गणेशमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरु असून, काही भाविकांनी… Continue reading अवघी करवीर नगरी झाली गणेशमय

‘सुबुद्धी दे गणनायका’

श्रीधर वि. कुलकर्णी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. घरोघरी गणपती बसविण्यामागे समाजातील ऐक्य साधण्याबरोबरच घरात हे संस्कार होत राहावेत, हाही मोठा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता. घराचे घरपण व समाजाचे सामाजिक स्वरूप एकत्रितपणे अबाधित राहावे हा त्यामागचा आणखी एक व्यापक हेतू होता. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून… Continue reading ‘सुबुद्धी दे गणनायका’

कळे परिसरातील ४० गावांतून मूर्तींना मोठी मागणी

कळे (प्रतिनिधी) : येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर रंगाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण कामात व्यस्त आहेत. दरवर्षी या ठिकाणचे मूर्तिकार जवळपास हजारो गणेशमूर्ती आणि गौराई घडवितात. परिसरात गणेशमूर्तीचे स्टॉल व बाजारपेठा सजल्या आहेत. कळे परिसरातील ४० गावांतून मूर्तींना मोठी मागणी आहे. यंदा सर्वच गोष्टी महागल्याने मूर्तीच्या किमतीतही २० टक्क्यांनी वाढ… Continue reading कळे परिसरातील ४० गावांतून मूर्तींना मोठी मागणी

‘स्वयंप्रभा’चे उपक्रम महिलांना प्रोत्साहन देणारे : खातू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणी नैवेद्य स्पर्धा’ आणि ‘बाळकृष्ण वेशभूषा स्पर्धा’ घेऊन महिलांच्या आनंदात खऱ्या अर्थाने रंग भरण्याचे आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम स्वयंप्रभा मंच करत आहे, असे प्रतिपादन ‘खातू मसालेचे’ शाळीग्राम खातू यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे ‘स्वयंप्रभा मंच’ व ‘रोटरी क्लब ऑफ होरायझन’ यांच्यावतीने आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत… Continue reading ‘स्वयंप्रभा’चे उपक्रम महिलांना प्रोत्साहन देणारे : खातू

‘बीज’ गणेशमूर्ती कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे शिवाजी विद्यापीठात पर्यावरणपूरक ‘बीज’ गणेशमूर्ती बनविण्याबाबत झालेल्या विशेष कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांसह ७५ जण त्यात सहभागी झाले. पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे गणेशोत्सव काळात ध्वनी, जल व वायू प्रदूषणाबाबत जनजागृतीबरोबरच मूर्तीदान, विसर्जनासाठी कृत्रिम तलावनिर्मिती, निर्माल्यकुंड, स्वच्छता, प्रदूषण पातळीची मोजणी असे उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही ‘बीज’ गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विविध अधिविभागांतील ५० विद्यार्थ्यांसह २५ शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.… Continue reading ‘बीज’ गणेशमूर्ती कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

विद्यापीठात गुरुवारी ‘सीड’ गणेश प्रतिकृती कार्यशाळा

कोल्हापूर :  गणरायाच्या आगमनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागामध्ये पर्यावरणपूरक ‘सीड’ गणेश प्रतिकृती कार्यशाळेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट रोजी दु. ३ ते ५ या दरम्यान केले आहे. अविघटनशील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्त्यांचे अनेक दुष्परिणाम आहेत. मूर्तीच्या आकाराचा, रंग रंगोटीचा मूर्तीच्या देवत्वाशी संबंध नसतो. त्यापेक्षा मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती या जास्त निसर्गपूरक असतात. कार्यशाळेदरम्यान गणेशमूर्ती तयार करताना… Continue reading विद्यापीठात गुरुवारी ‘सीड’ गणेश प्रतिकृती कार्यशाळा

कोल्हापूरची ऋज्वी पाटील दुबईतील नृत्य स्पर्धेत द्वितीय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड कला सादरीकरण स्पर्धेत कोल्हापूरची सुकन्या ऋज्वी महेश पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला. दुबईतील ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट आणि कल्चरच्या वतीने या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते.  ‘ऋज्वी’ला कोल्हापूरच्या नर्तना स्कूल ऑफ डान्सच्या संचालिका कविता नायर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसिद्ध एज्युकेशन कौन्सलर महेश पाटील (राजारामपुरी,… Continue reading कोल्हापूरची ऋज्वी पाटील दुबईतील नृत्य स्पर्धेत द्वितीय

गणेशोत्सव शांततेत साजरा करावा : कल्पना ढवळे

कुंभोज (प्रतिनिधी) : कायद्याच्या चौकटीत राहून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करण्याचे आवाहन हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले. त्या हातकणंगले येथे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव आढावा बैठकीत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव असावा, पारंपरिक वाद्याचा वापर करावा, एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी,  वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने… Continue reading गणेशोत्सव शांततेत साजरा करावा : कल्पना ढवळे

हिंदूंबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पक्षपात : आदित्य शास्त्री

कोल्हापूर : हिंदूंच्या विविध सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हिंदूंबाबत पक्षपात केला जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांनी केला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित ‘हिंदू राष्ट्र जागृती आंदोलना’त… Continue reading हिंदूंबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पक्षपात : आदित्य शास्त्री

बिनखांबी मंदिरातील मूळ दगडी मूर्ती दर्शनासाठी खुली

कोल्हापुर (प्रतिनिधी) : महाव्दार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरातील मूर्तीवरील १९० वर्षांपासूनचा शेंदूरचा थर काढून देवस्थान समितीच्या वतीने मूर्ती मूळ रूपात आणण्यात आली आहे. या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना विविध धार्मिक सोहळ्यांनी झाली. तसेच यानिमित्ताने गणेश यागचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या शिखरावरील कलशास क्रेन बकेटच्या साह्याने अभिषेक करण्यात आला. सनई- चोघड्याच्या तालात मंदिरासाठीचे भव्य आकर्षक तोरण वाजतगाजत… Continue reading बिनखांबी मंदिरातील मूळ दगडी मूर्ती दर्शनासाठी खुली

error: Content is protected !!