नवी दिशा देणारे दीपक चौरगे यांची गोशिमाच्या अध्यक्षपदी निवड अभिमानस्पद: रवींद्र मोरे

कोल्हापुर (प्रतिनिधी) : देशाच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायामध्ये गोकुळ शिरगाव औद्योगिक महामंडळाचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच गोकुळ शिरगाव मॅनुफॅक्च्युरिंग असोशिएशनच्या अर्थात गोशिमाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. यंदाची गोशिमाची निवडणूक पार मोठ्या उत्साहात पडली. या निवडणुकीत गोशिमाच्या अध्यक्षपदी दीपक चौरगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शांत, संयमी, व भविष्याचा वेध घेवून नवी दिशा देणारे… Continue reading नवी दिशा देणारे दीपक चौरगे यांची गोशिमाच्या अध्यक्षपदी निवड अभिमानस्पद: रवींद्र मोरे

मुंबईसह देशातील ८ शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील ८ शहरांमध्ये आजपासून (१ ऑक्टोबर) 5G मोबाइल सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवा सुरू केली. देशात दोन मोठ्या मोबाईल कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलने वाराणसीमध्ये आणि जिओने अहमदाबादमधील एका गावात 5G ची सुरुवात केली. यावेळी उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित… Continue reading मुंबईसह देशातील ८ शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा सुरु

घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे. नवे इंधन दर जारी झाले असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.… Continue reading घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

जिल्हा बँकेतर्फे विविध उद्योगांसाठी अर्थपुरवठा करण्याचा निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासह विविध उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभ झाली. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासह नव्या चारचाकी व दुचाकी वाहनांसह जुन्या वाहनांना, तसेच रेशीम उद्योग, मधमाशापालन व लाख उत्पादन अशा उद्योगांना कर्ज पुरवठा केला जाणार… Continue reading जिल्हा बँकेतर्फे विविध उद्योगांसाठी अर्थपुरवठा करण्याचा निर्णय

रासायनिक, सेंद्रिय खते वाजवी दरात देणार : घाटगे

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री सोसायटी या संस्थेची घोडदौड प्रगतिपथावर आहे. या संघामार्फत उत्कृष्ट दर्जाचे रासायनिक व सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सभासदांना वाजवी दरात पुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कागल येथे संघाच्या ४० व्या वार्षिक सभेत बोलत होते. ते म्हणाले, सभासद, शेतकऱ्यांना चांगली सेवा देणेच्या… Continue reading रासायनिक, सेंद्रिय खते वाजवी दरात देणार : घाटगे

रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशात आर्थिक मंदीचं संकट घोंगावत असताना आरबीआयने आणखी एक धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ केली असून, यामुळे कर्जाचे हप्ते महाग होणार आहेत. नवीन कर्जेदेखील महाग होणार आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याजदर ५.९० टक्के इतका झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी चलनविषयक धोरण समितीसोबत तीन… Continue reading रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होणार

आजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी

आजरा (प्रतिनिधी) : केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे ३० कोटींच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग सुरु करणार असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. आजरा तालुक्यातील खेडे येथील अण्णा भाऊ सहकारी सूतगिरणीच्या४३ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी होत्या.  चराटी म्हणाले, १५६पैकी दोनच सूतगिरण्या… Continue reading आजरा सूतगिरणीच्या ८५ एकरांमध्ये उद्योग उभारणार : अशोक चराटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी सरकारने मार्चमध्ये डीए वाढवला होता. तो १ जानेवारी २०२२ पासून लागू झाला. मार्चमध्ये सरकारने डीएमध्ये ३ टक्के वाढ केली होती. म्हणजेच ती ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के केली होती.… Continue reading केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

साखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री गटाची विशेष बैठक बोलावून तातडीने साखर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. शिवाय डिस्टीलरी/इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्यांच्या सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास गोयल यांनी संमती दर्शवली आहे. ८० लाख टन साखर निर्यात आणि व्याज अनुदान योजनेला मुदतवाढ मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक… Continue reading साखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल

सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न…

हमिदवाडा (प्रतिनिधी) : इथेनॉल निर्मिती साखर कारखान्यासाठी वरदान ठरणार आहे. देशात ५५० कोटी लिटर दरवर्षी इथेनॉल निर्मिती केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्याबरोबर ऊस उत्पादन गाळप क्षमता व सहवीज प्रकल्प विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. सभासदांनी स्वभाडवलांसाठी कारखान्याकडे ठेवीच्या रूपाने स्वनिधी द्यावा, असे आवाहन चेअरमन संजय मंडलिक यांनी वार्षिक सर्वसाधारण… Continue reading सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न…

error: Content is protected !!