सुभाषनगरमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला : १० तोळे दागिने लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सुभाषनगरमधील आज (शुक्रवार) पहाटे ज्योर्तिंलिंग नगरात महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. दिलीप शंकर जानवेकर यांच्या बंगल्याचे कुलप-कोयंडा तोडून चोरट्यांनी दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केलीयं. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सुभाषनगर येथील सिरतमोहल्ला येथे महापालिकेचे निवृत्त अधिकारी… Continue reading सुभाषनगरमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला : १० तोळे दागिने लंपास

गांधीनगर बाजारपेठेत तीन दुकानावर छापा : साडेतीन लाखांचा बनावट माल जप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लिवाईस स्ट्रॉस अँड कंपनीचा लिवाइस हा लोगो वापरून या कंपनीची बनावट उत्पादने विकणाऱ्या गांधीनगर बाजारपेठेतील सोनी बॅग्ज, रोहित ट्रेडर्स आणि तनिष्क या दुकानांवर आज (गुरुवार) छापा टाकून ३ लाख ५७ हजार ६९६ रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला. सोनी बॅग व रोहित ट्रेडर्सचे रितेश राजकुमार जेवराणी (रा. ताराबाई पार्क कोल्हापूर) व तनिष्क… Continue reading गांधीनगर बाजारपेठेत तीन दुकानावर छापा : साडेतीन लाखांचा बनावट माल जप्त…

सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मयत वडिलांची पेन्शन आईच्या नावे मंजूर झालेल्या कागदपत्रांच्या व्हेरिफेकेशनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला ५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. राजेश प्रकाश खाडे (वय 36,  रा. न्यू पॅलेस रमणमळा, कोल्हापूर) असे याचे नाव आहे. यातील तक्रारदारांचे वडील मयत झाले आहेत. मयत वडिलांची पेन्शन तक्रारदारांच्या आईचे नावे करण्यासाठी कागदपत्रांची… Continue reading सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक…

इचलकरंजी येथे ‘गावठी कट्टा’ विकणाऱ्याला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील संतमळ्यात हुतात्मा बाबू गेणू शाळेसमोर बेकायदेशीर गावठी कट्टा (बंदूक) विक्री करण्याऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय. प्रसाद सागर थोरात (वय २६, रा. दातार मळा, इचलकरंजी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे. प्रसाद थोरात याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा (बंदूक) आणि दोन जिवंत राऊंड असा १० हजार… Continue reading इचलकरंजी येथे ‘गावठी कट्टा’ विकणाऱ्याला अटक…

वाहन चोरी प्रकरणी पुलाची शिरोली येथील एकाला अटक…

टोप (प्रतिनिधी) : वाहन चोरी प्रकरणी पुलाची शिरोली येथील एकाला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी आज (बुधवार) अटक केली. शैलेश संजय कांबळे (वय २३, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक अंदाजे किंमत चार लाख तीस हजार रुपये ही पोलिसांनी जप्त केली.  याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, … Continue reading वाहन चोरी प्रकरणी पुलाची शिरोली येथील एकाला अटक…

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरात तक्रारदाराच्या वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देण्यासाठी १५ हजार लाचेची मागणी करुन तात्काळ १० हजार स्विकारले आणि उर्वरित ५ हजारांची लाच स्विकारताना शाहुपूरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकला रंगेहात पकडण्यात आले. सागर इराप्पा कोळी (वय ४३, रा. उचगाव ता. करवीर) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित पोलीस नाईकांचे नाव आहे. अशी माहिती लाचलुचपत… Continue reading शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात…

मुंबई पोलीसांची मोठी कारवाई : दहिसर येथे तब्बल १४ कोटींचे काश्मिरी चरस जप्त

मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई सुरु आहे. आज (मंगळवार) मुंबईत दहिसर चेकनाका इथून एका गाडीतून २४ किलो काश्मिरी चरस जप्त केलं आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलं असून यात २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर चेकनाका इथे सापळा रचून ही कारवाई केली.… Continue reading मुंबई पोलीसांची मोठी कारवाई : दहिसर येथे तब्बल १४ कोटींचे काश्मिरी चरस जप्त

कळे येथे जुगार अड्डयावर छापा : चौघांवर गुन्हा दाखल

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मटका अड्डयावर छापा टाकून सतिश पांडूरंग कुंभार (वय ४०, रा. डवंग गल्ली, कळे), तानाजी हिंदूराव जाधव (रा. कळे, ता. पन्हाळा), विश्वास शंकर कुरणे  (वय ५०, रा. कळे, डवंग गल्ली, ता. पन्हाळा), करण माने (रा. कोल्हापूर) यांना  गुन्हे अन्वेषण पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबतची फिर्याद पो. कॉ. सोमराज पाटील आणि… Continue reading कळे येथे जुगार अड्डयावर छापा : चौघांवर गुन्हा दाखल

तारदाळ येथे एका पानपट्टीचालकाचा निर्घुण खून…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील तारदाळ हद्दीलगत असलेल्या प्राईड इंडिया पार्कच्या सांगले मळ्यातील पानंद रस्त्यावर युवकाचा निर्घुण खून झाला आहे. संदीप घट्टे (वय ४०, रा. कोरोची, ता. हातकणंगले) असे या मृत युवकाचे नाव आहे. इचलकरंजी लगत असलेल्या तारदाळ प्राईड इंडिया पार्क नावाची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक उद्योग आहेत. या वसाहती लगत सांगले मळा पानंद… Continue reading तारदाळ येथे एका पानपट्टीचालकाचा निर्घुण खून…

सुळे येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा

कळे (प्रतिनिधी) :  सुळे (ता.पन्हाळा) येथे वैध दारूची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  धैर्यशील आनंदा सुळेकर (वय ३९,  रा. सुळे ता.पन्हाळा), नंदकुमार पांडूरंग पाटील (रा. मरळी, ता. पन्हाळा)  अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ हजार ६८१ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धैर्यशील सुळेकर यांच्या… Continue reading सुळे येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा

error: Content is protected !!